Cotton Rate: आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात कापूस दरात आज काहीशी दिलासादायक स्थिती आहे. कापसाच्या दरात मागील पाच ते सहा दिवसांपासून चढ-उतार सुरु होते आणि आज आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे काहीसे नरमले होते. मात्र कालच्या तुलनेत दरात आज वाढ पाहायला मिळाली आहे. आज कापसाचे वायदे ८२.१८ सेंट प्रतिपाऊंडने पार पडले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरावर चीनमधील कोरोना स्थिती, वाढती महागाई आणि इंधनाचे वाढलेले दर याचा परिणाम होत आहे आणि चीनमध्ये पुन्हा कोरोना निर्बंध कडक होत आहेत. याचा परिणाम चीनच्या कापूस मागणीवर होण्याच्या भीतीने दर तुटले होते ते आता काहीसे उभारी घेत आहेत.
देशातील बाजारात आज कापूस दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली आहे. देशातील बाजारात कापसाचे दर मागील सहा दिवसांमध्ये सरासरी ५०० रुपयाने नरमले होते मात्र आज अनेक बाजारांमध्ये कापूस दर क्विंटलमागे सरासरी २०० रुपयांनी सुधारले होते. तर कमाल दरातही काहीशी सुधारणा पाहायला मिळाली तर बहुतांशी बाजारात कापसाचे दर आजही सरासरीच्या जवळपास होत आहे. मात्र देशातील कापूस बाजारात आज सकारात्मक वातावरण होते, असे कापूस व्यापाऱ्यांनी सांगितले जात आहे.
आजची दरपातळी
आज कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ८ हजार ३०० ते ८ हजार ८०० रुपये दर मिळाला आहे. मात्र कमाल दराने आजही ९ दराचा टप्पा पार केला नाही. गुजरात आणि तेलंगणात काही ठिकाणी कापसाला कमाल ९ हजार ३०० रुपयांचा दर मिळाला मात्र राज्यात कमाल दर अपेक्षेप्रमाणं वाढले नाहीत.Cotton Rate
कापूस दर सुधारणार का?
सध्या कापसाच्या दरात चढउतार सुरु आहेत आणि कापूस दरातील ही स्थिती पुढील महिनाभर राहण्याचा अंदाज आहे. मात्र शेतकऱ्यांनी कापूस विक्री टप्प्याटप्प्याने केल्यास बाजारातील आवक मर्यादीत राहील आहे. त्यामुळं दर जास्त तुटणार नाहीत आणि असं झाल्यास जानेवारीपासून कापसाच्या दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.Cotton Rate