Weather : पावसाने उघडीप दिल्याने राज्यात उन्हाचा चटका (Temperature) प्रचंड वाढला आहे. यातच पावसाला पोषक वातावरण (Favorable Weather Condition For Rain) असल्याने आज (ता. ५) विदर्भ, मराठवाड्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता (Rain Forecast) वर्तविली आहे. उर्वरित राज्यात आकाश ढगाळ (Cloudy Weather) राहून, उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला गेला आहे.
उत्तरकशी, नाझियाबाद, आग्रा, ग्वालियर, रतलाम, भारूच पर्यंतच्या भागातून मॉन्सून परतला असून, परतीची ही सीमा मंगळवारी (ता. ४) कायम होती आणि पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र कायम राहणार आहे.
त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या प्रणालीपासून वायव्य उत्तर प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाला पोषक हवामान होत आहे.
राज्याच्या बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली आहे आणि पावसाने उघडीप दिलेल्या भागात उन्हाचा चटका वाढला आहे. तर अंशतः ढगाळ हवामानामुळे उकाड्यातही काही आवंश वाढ झाली आहे. राज्यात कमाल तापमानाचा पारा ३० ते ३७ अंशांदरम्यान आहे.
तापमानात वाढ होत असल्याने ऑक्टोबर हीटचा चटका जाणवण्याची शक्यता आहे तसेच आज (ता. ५) विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.
हे हि वाचा : ‘पारिवारिक शेती’ म्हणजे काय?