जळगाव : cotton जिल्ह्यात अनेक ठिकाणी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस(cotton) खरेदीला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना जणू बाप्पाच पावला आणि आणि बोदवड येथे कापसाला १६ हजार रुपये, तर सातगाव डोंगरी, ता. पाचोरा येथे १४,७७२ रुपये असा उच्चांकी भाव मिळाला आहे.
पांढऱ्या सोन्याचे नंदनवन असलेल्या बोदवड तालुक्यात बुधवारी कापूस खरेदीचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. त्यात खरेदीच्या शुभ मुहूर्तावर सोळा हजारांचा भाव देण्यात आल्याने कापसाची(cotton) यंदाची सुरुवात जोरदार झाली आहे. वैष्णवी ट्रेडर्सचे संचालक राजू वैष्णव यांनी कापूस खरेदीचा शुभारंभ केला आहे आणि त्यात १६ हजारांचा भाव मिळाला.
सातगाव डोंगरी, ता. पाचोरा येथील व्यापारी बाळू शंकर वाघ आणि ज्ञानेश्वर शंकर अमृतकर यांनी (cotton) १४ हजार ७७२ रुपये भावाने कापूस खरेदी केला आहे. पहिल्या दिवशी ६७ किलो कापूस खरेदी झाला आहे.
धरणगाव येथे श्री जिनिंगमध्ये कापूस खरेदीला सुरुवात झाली आणि या मुहूर्ताचा भाव यावेळी ११ हजार १५३ रुपये प्रतिक्विंटल असा मिळाला आहे . पहिल्याच दिवशी मुहूर्तावर साधारण एक हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. धरणगाव तालुक्यातील जिनिंग उद्योगात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस(cotton) खरेदीला सुरुवात होत असते आणि यावेळी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह जीवनसिंह बयस, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी आदी यावेळी उपस्थित होते. याशिवाय बाळद, ता. पाचोरा, कासोदा ता. एरंडोल आणि कजगाव, ता. भडगाव येथेही कापूस खरेदी सुरू झाली होत आहे.
असा मिळाला भाव (क्विंटलप्रमाणे)
– बोदवड : १६,००० रुपये
– सातगाव डोंगरी : १४,७७२ रुपये
– बाळद : ११,५५१ रुपये
– धरणगाव : ११,१५३ रुपये
– कासोदा : ११,०११ रुपये
-कजगाव : ११,००० रुपये
हे हि वाचा :मिरची, वांगी, टोमॅटोवरील किडींसाठी काय उपाय करावेत? कोणती फवारण्या कराव्यात पहा
2 thoughts on “cotton: कापसाला आला १६ हजारांचा भाव शेतकरी आनंदात 2022”