Cultivation of figs: अंजीर लागवड - डिजिटल शेतकरी

Cultivation of figs: अंजीर लागवड

हवामान

Cultivation of figs : अंजीर लागवडसाठी  उष्‍ण व कोरडे हवामान अंजिराला चांगले मानवते. त्‍यामुळे महाराष्‍ट्रात हे फळ आणखी मोठया क्षेत्रात करायला भरपूर वाव मिळत  आहे. कमी उष्‍णतापमान या पिकाला घातक ठरत नसते. ओलसर दमट हवामान मात्र निश्चितपणे घातक ठरत असते . विशेषतः कमी पावसाच्‍या भागात जिथे ऑक्‍टोबर ते मार्चपर्यंत पाण्‍याची थोडीफार सोय आहे अशा ठिकाणी अंजिर लागवडीस करण्यास काही हरकत नही.

जमीन

अंजीर लागवडसाठी  अगदी हलक्‍या माळरानापासून मध्‍यम काळया व तांबडया जमिनीपर्यंत अंजीर लागवड करतात . भरपूर चुनखडी असलेल्‍या तांबूस काळया जमिनीत अंजीर उत्‍तम वाढत असते. चांगला निचरा असलेली एक मीटर पर्यंत खोल असलेली कसदार जमीन अंजीरासाठी उत्‍तम आहे. मात्र या जमिनीत चुन्‍याचे प्रमाण असावे लागते. खूप काळया मातीची जमिन या फळझाडाला अयोग्‍य ठरत असते.Cultivation of figs

सुधारीत जाती

अंजीर लागवडसाठी  अंजिराच्‍या अनेक जाती आहेत. त्‍यात सिमरना, कालिमिरना, कडोटा, काबूल, मार्सेल्‍स, (व्‍हाईट सान पेट्रो) आदी जाती चागल्या आहेत . पुणे भागातील पुना अंजीर नावाने प्रसिध्‍द असलेली जात (ऍड्रिऍटिक ) किंवा कॉमन या प्रकारातील असून महाराष्‍ट्रात मुख्‍यतः हीच जात जास्त प्रमाणात  लावली जाते.

 

हे हि पहा : लिंबू लागवडी विषयी माहिती 2022

 

लागवड

पावसाळयापूर्वी मे महिन्‍यात 5 × 5 मीटर अंतरावर 0.60 × 0.60 × 0.60 मिरटरचे खडडे घ्‍यावेत तुम्ही यात कमी जास्त करू शकता. शिफारस केलेल्‍या अंतरानुसार अंजीर फळपिकाची लागवड केल्‍यास हेक्‍टरी 400 झाडांची लागवड होत असते. चांगली माती, पोयटा, शेणखत, रासायनिक खत सिंगल सुपर फॉस्‍पेट 1/3 किलो प्रति खडडा व थायमेट 10 जी बांगडी पध्‍दतीने वापरुन पावसाळयापूर्वी खडडे भरुन घेतले पाहिजे. जून, जूलै मध्‍ये जमिनीत पाऊस पडून भरपूर ओल झाल्‍यावर अंजीराची मुळे फूटलेली रोपे खडडयात हि लावली जातात. रोपावर भरपूर पाने फूटलेली असल्‍यास फक्‍त 2 ते 3 पाने ठेवून बाकीची पाने खोडाला इजा न होता काढून टाकली जावी. खडडयात मधोमध रोप लावून पाण्‍याची चूळ द्यावी नंतर कलम रूजेपर्यंत ती चार दिवसांनी गरजेनुसार पाणी दिले पाहिजे.Cultivation of figs

खते

अंजीराच्‍या झाडांनी नीट व जोमाने वाढ होण्‍यासाठी लागवडीच्‍या सुरुवातीच्‍या काळात नियमित खते हि दिली पाहिजे. एक वर्षाच्‍या झाडाला साधारणपणे 1 ते दीड  घमेले शेणखत व 100 ते 150 ग्रॅम अमोनियम सल्‍फेट पुरेसे होते. दरवर्षी हे प्रमाण वाढवीत नेऊन 5-६  वर्षे वयाच्‍या झाडांना 4 ते 6  घमेली शेण खत व 1 किलो अमोनियम सल्फेट द्यावे. लहान झाडांना खते नेहमी पावसाळयाच्‍या सुरुवातीला घालावीत नंतर मात्र मोठया झाडांना खते विश्रांततीचा काळ संपताना म्‍हणजे सप्‍टेबर महीन्‍याच्‍या अखेरीस दिली पाहिजे. 5 ते 6 वर्षे वयाच्‍या झाडास 600-६५०  ग्रॅम नत्र 250 ग्रॅम स्‍फूरद व 250 ग्रॅम पालाश दिल्‍याने फळे चांगल्‍या प्रतीची मिळतात.

पाणीपुरवठा

अंजीराच्‍या झाडाला फार काय जास्त  पाणी लागत नाही. परत फळझाड वाढीच्‍या काळात हंगाम, जमिनीचा मगदूर व मशागतीचा प्रकार यानुसार जरुरीप्रमाणे नियमित पाणी द्यावे झाड फळावर आल्‍यावर ऑक्‍टोबर ते मे महिन्‍यात नियमित पाणी दिले पाहिजे. जूलै व ऑगस्‍ट हा काळ झाडाच्‍या विश्रांतीचा असतो. फळे लागून वाढत असताना पाण्‍यात हयगय होऊ देऊ नये जास्त पाणी द्या.

बहार धरणे

अंजीराला दोन वेळा फळ बहार येत असतो . पावसाळयात येणा-या बहाराला खटटा आणि उन्‍हाळयात येणा-या बहाराला मीठा बहार असे  म्‍हणतात. खटटा बहारातील फळे जूलै किवा ऑगस्‍टमध्‍ये तयार होतात, परंतु ती अत्‍यंत बेचव गोडीला कमी असतात . त्‍यामुळे त्‍यांचा जेली कोथिंबीर रण्‍याकरिता उपयोग केला जात असतो. मीठा बहारातील फळे मार्च, एप्रिलमध्‍ये तयार होत असतात. फळांचा दर्जा व उत्‍पन्‍न चांगल्‍या प्रतीचे मिळते व बाजारभाव सुध्‍दा चांगला मिळत असतो. त्‍यामुळे शेतकरी बांधवांनी या बहाराची खास काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी सप्‍टेबर महिन्‍यात एक उथळ नांगरट करुन एक दोन आठवडे भरपूर  ताण द्यावा. मागील वर्षाच्‍या फांद्यांची पध्‍दतशिरपणे छाटणी करुन वर नमुद केल्‍याप्रमाणे खताची मात्रा दिली पाहिजे. यावेळी शेणखत स्‍फूरद, पालाश व नत्राचा निम्‍मा हप्‍ता  हा द्यावा. झाडांची सुप्‍तावस्‍था संपून त्‍यांना पाणी आणि खतांचा पुरवठा होताच ऑक्‍टोबर ते डिसेंबर दरम्‍यान झाडावर नवीन फूट व फळे वाढीस लागत असतात. फळांची वाढ चांगली होण्‍यासाठी नत्राचा उरलेला हप्‍ता नोव्‍हेंबर अखेर दिला पहिजे. फळे वाढू लागल्‍यापासून फळे निघेपर्यंत पाण्‍याची उणिव भासू देऊ नका.Cultivation of figs

फळांची काढणी

दुस-या वर्षापासून अंजिरास थोडी थोडी फळे येऊ लागत असतात. परंतु फळाचे उत्‍पादन झाडे उत्‍महाराष्‍ट्रम पोसेपर्यंत घेऊ नका . चवथ्‍या वर्षापासून उत्‍पादन घेण्‍यास काही  हरकत नाही. सात आठ वर्षाची झाडे झाल्‍यावर उत्‍पादन चांगले येत असते. उत्‍तम काळजी, मशागत, खते दिली तर एका झाडापासून 32  ते 40 किलो फळे मिळतात.

बहार धरल्‍यापासून 125 ते 145  दिवसात फळे काढणेस तयार होतात.

अंजीरावरील किडी व त्‍याचे नियंत्रण

तुडतुडे

: कोवळी पाने, फांद्या व फळे यातील रस तुडतुडे शोषून घेत असतात. त्‍यामुळे पानाच्‍या कडा पिवळया पडून नंतर संपूर्ण पान तपकिरी होवून वाळत असते. किडीच्‍या तीव्र उपद्रवात फळांची वाढड खुंटते व फळे गळून पडत असतात. बहार धरल्‍यानंतर रोजच्‍या रोज बागेवर लक्ष ठेवून किड आढळताच नियंत्रणाचे उपाय योजना  करावेत. यासाठी बहाराच्‍या आरंभीच 100-११०  लिटर पाण्‍यात 200 मिली रोगार 250-२७०  ग्रॅम पाण्‍यात मिसळणारे गंधक घालून फवारा द्यावा.

कोळी किड

: ही अत्‍यंत सुक्ष्‍म आकाराची किडे असतात. या किडीमुळे पाने सुकतात कारण ही कीड पाने व फळे समुहाने कुरतडते व रस शोषून घेत असतात. फळे विद्रूप दिसतात व अपुरी वाढ होवून गळत असतात. किडीची लक्षणे दिसताच 100-120  लिटर पाण्‍यात 250 ग्रॅम पाण्‍यात मिसळणारे गंधक घालून फवारावे.

सालबुंधा पोखरणारी आळी

: झाडाच्‍या  बुंध्‍यावर किंवा फांदीवर भोक पाडून आळी आत जाते व आतील मगंज खाऊन घाण बाहेर टाकत असते. अशी घाण दिसल्‍यावर आपणास अळीचा उपद्रव दिसत असतो. किड होवू नये म्‍हणून झाडाचे नियमित निरिक्षण कले पाहिजे. भूसा पडलेला दिसताच आळीने पाडलेले भोक शोधून अळी बाहेर काढून मारली जावी. अळी न निघाल्‍यास भोकात पेट्रोल किंवा बोअरसोल्‍युशन कापसाच्‍या बोळयाने आंत सोडावे व भोक चिखलाने बंद करण्यात याविये.

fig frut

पाने खाणारी अळी

: पाने खाणारी अटी पानाकडून मध्‍य शिरेकडे पानाचा भाग कुरतडून खात असते. मोठया प्रमाणावर उपद्रव झाल्‍यास झाडाची पाने नष्‍ट होवून पिकाचे नुकसान होत असते.  बागेवर 100-११०  लिटर पाण्‍यात 100 मिली मॅलेथिआन किंवा नुवाक्रान किडनाशक फवारावे.

खवले किड

: खवले किडीचा उपद्रव अंजीरावरही होत असतो. ही किड फांद्या कोवळया फुटी, डोळे यावर समुहाने राहून रस शोषत असतात. या उपद्रवाने कोवळा फांद्या वाळताना दिसून येतात. फळाचा आकार बेढब होतो आणि फळाची चव बिघडते खवले  किडीच्‍या अंगावर जाड कवच असल्‍याने तिच्‍यावर या फवारलेल्‍या स्‍पर्श विषाचा काहीही उपयोग होत नाही, त्‍याकरीता नुऑक्रॉन, रोगार, डिमॅक्रॉन अशा अंतरप्रवाही औषधाचे किड संपूर्ण नष्‍ट होईपर्यंत औषधाचे फवारे कायम दिले पाहिजे.

 

हे हि पहा : लिंबू लागवडी विषयी माहिती 2022

 

अंजीरावरील रोग व त्‍याचे नियंत्रण

तांबेरा

: पावसाळयात एक प्रकारच्‍या बुरशीपासून अंजीरावर तांबेरा होत असतो. हिवाळयात हवामान दमट राहीले तर नोव्‍हेंबर ते फेब्रूवारी अखेरपर्यंत हा रोगा पानावर तांबडया ठिपक्‍यात आढळून येत असतो. नंतर हे ठिपके काळे पडून पाने गळायला सुरवात होतात. पाने गळून पडल्‍यामुळे साल उघडी होते व उन्‍हामुळे सालीवर करपल्‍यासारखे चटटे पडत असतात. त्‍यामुळे फांद्या कमजोर होवून फांदयावरील फळे न पोसता गळून पडत असतात.

भूरी

: अंजीरावर भूरी रोगही होत असतो. त्‍यासाठी भूरी दिसताच 100-110  लिटर पाण्‍यात 100 ग्रॅम बावीस्‍टीन घालून फवारावे.

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

2 thoughts on “Cultivation of figs: अंजीर लागवड”

Leave a Comment