Divorce: ही आहेत, सध्याच्या काळातील घटस्फोटाची 8 कारणे, सर्वेक्षणातून समोर आली धक्कादायक माहिती - डिजिटल शेतकरी

Divorce: ही आहेत, सध्याच्या काळातील घटस्फोटाची 8 कारणे, सर्वेक्षणातून समोर आली धक्कादायक माहिती

Divorce: लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हणत असतात. पण त्या सुटायला किवा तुटायला क्षुल्लक वाटावे, असे एखादे कारणही पुरेसे होत असते. याचाच प्रत्यय गेल्या काही वर्षांत देशात झालेल्या घटस्फोटांच्या वाढत्या संख्येतून पुढे येत आहे. घटस्फोटांची केवळ संख्याच वाढत नाहीये तर त्यासाठी दिल्या जाणाऱ्या नित्याच्या कारणांतही आमूलाग्र बदल होताना दिसत आहे तसेच गेल्या काही वर्षांत चित्रविचित्र कारणांमुळे झालेल्या घटस्फोटांची(Divorce) जंत्री एका सर्वेक्षणाद्वारे पुढे आली  आहे.

पत्नी चहा करून देत नाही

दीड महिना सकाळचा पहिला चहा पत्नीने करून दिला नाही तसेच मित्र आल्यानंतर देखील चहा करण्यास नकार दिला, त्यामुळे अपमान झाला या कारणास्तव एका व्यक्तीने घटस्फोट (Divorce)घेतला आहे.

मांसाहार आवडतो

प्रेम विवाह केलेल्या एका मुलाने लग्नानंतर आपण मांसाहार करणार नसल्याचे सांगितले असता  मात्र, तरीही त्याला मांसाहाराची इच्छा अनावर झाल्याने त्याने अनेक रात्री मित्रांकडे राहत मांसाहार केल्याचे पत्नीला समजले. पत्नीने फसवणूक झाल्याचे सांगत घटस्फोट घेतला आहे.

वजन वाढले

पत्नीचे वजन वाढले आणि तिचे शरीर बेढब दिसू लागले असता . अनेकवेळा सांगूनही तिने त्यासंदर्भात काहीच केले नाही त्यामुळे मानसिक त्रास झाल्याचे सांगत एका पतीने काडीमोड घेतला आहे.

आईसारखा स्वयंपाक करत नाही

आईच्या हातच्या स्वयंपाकाची चव पत्नीच्या हाताला नाही आणि  यामुळे जेवणाचा भ्रमनिरास होत असल्याचे सांगत एक जण पत्नीपासून विभक्त झाला.

पत्नीच्या गालावर पिंपल्स आहेत

पत्नीच्या गालावर अनेक पिंपल्स आहे आणि  त्यामुळे मला मानसिक त्रास होतो. ती नकोशी वाटतेय, या कारणास्तव ही एकाचा घटस्फोट घेतला आहे.

पतीचा अनादर केला

करवाँ चौथला पतीच्या पायाला स्पर्श करून नमस्कार न केल्यामुळे अनादर झाल्याच्या भावनेतून वितंडवाद झाल्यानंतर एका पतीने घटस्फोट घेतला आहे.

नवरा भांडतच नाही

नवऱ्याला मी खूप आवडते आणि तो कधीच भांडत नाही आणि  कधीच विरोध करत नाही. पत्नीचे सर्वच त्याला पटते, यामुळे वैताग होत असल्याच्या भावनेतून एक महिला पतीपासून विभक्त झाली आहे.

घर लहान आहे

लग्नापूर्वीचे घर मोठे होते आणि लग्नानंतर लहान घरात राहावे लागत आहे. मोठ्या घरासाठी नवरा काहीच करत नाही या कारणास्तव देखील घटस्फोट घेतला  आहे.

हे हि वाचा : शेतकर्याना कर्ज महागणार केंद्राच्या असंवेदनशील धोरणाचा शेतकऱ्यांना पुन्हा शॉक

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

Leave a Comment