राहुल गांधी यांची आज चौथ्यांदा ED चौकशी होणार 2022 - डिजिटल शेतकरी

राहुल गांधी यांची आज चौथ्यांदा ED चौकशी होणार 2022

नॅशनल हेराल्डच्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांची आज पुन्हा एकदा  चौथ्यांदा सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी केली जाणार आहे. गेल्याच आठवड्यात सगल तीन दिवस राहुल गांधी  चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता आजही राहुल गांधी ईडीसमोर हजर राहणार आहेत असे सूत्राकडून समजले आहे.

काँग्रेसची आजही निदर्शने

गेल्या मागील  आठवड्यात सलग तीन दिवस राहुल गांधी यांची चौकशी झाली होती. राहुल गांधी यांनी पहिल्यांदा 13 जून रोजी ईडी कार्यालयात हजेरी लावली होती . राहुल गांधींच्या चौकशीवरुन देशभरातील काँग्रेस आक्रमक झाली, अनेक राज्यात केंद्र सरकारविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली होती . आता आजही राहुल गांधींच्या चौकशविरोधात काँग्रेस दिल्लीत निदर्शने करणार असल्याची माहिती समोर यत आहे. दरम्यान, राहुल गांधींच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची आज भेट घेणार आहे.

सलग तीन दिवस चौकशी

राहुल गांधी यांची गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस चौकशी झाली होती . यादरम्यान, राहुल यांना बँक खाती, परदेशी मालमत्ता आणि यंग इंडियन आणि असोसिएट जर्नल लिमिटेडला दिलेल्या कर्जाबाबत चौकशी करण्यात आली होती . चौकशीदरम्यान विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राहुल गांधी यांनी संपूर्ण स्पष्टीकरण दिल्याची माहिती समोर  आहे.

Leave a Comment