शिवसेनेला अजून एक धक्का अर्जुन खोतकरांवर ईडी कारवाई; कारखान्याची २०० एकर जमीन जप्त - डिजिटल शेतकरी

शिवसेनेला अजून एक धक्का अर्जुन खोतकरांवर ईडी कारवाई; कारखान्याची २०० एकर जमीन जप्त

मुंबई: ईडी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेच्या प्रमुख फळीतील नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण आता  ढवळून निघाले आहे. शिवसेनेसह महाविकास आघाडीसाठी हा एक मोठा भूकंप धक्का  मानला जात आहे. यानंतर आता शिवसेना आणि शिंदे गट यांतील संघर्ष तीव्र होताना पाहत आहोत . यातच शिवसेनेला एकावर एक धक्के बसत चालले आहेत. एकाबाजूला शिंदे गटाचे मोठे बंड, दुसऱ्या बाजूला अनिल परब यांची ईडीकडून सलग चौकशी सुरू असताना  यात आणखी भर म्हणून शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या साखर कारखान्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील साखर कारखान्यावर ईडीने मोठी  कारवाई केली आहे. यामध्ये कारखान्याची २०० एकर जमीन आणि यंत्रसामग्री ईडीने जप्त करण्यात आली  आहे. काही दिवसांपूर्वी याच कारखान्यावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता आणि यानंतर आता या कारखान्याच्या जमिनीच्या जप्तीचा निर्णय ईडीकडून घेण्यात आला आहे. यामध्ये कारखान्याची इमारत, संबधित जमीन आणि त्यातील यंत्रसामग्री या सर्वांचा समावेश होता आहे. या कारखान्याच्या विक्रीचा व्यवहार चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

अर्जुन खोतकर संचालक असलेला हा कारखाना आहे

शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर हे या कारखान्याच्या संचालक मंडळावर असल्याचे सांगितले जात आहे आणि  या कारखान्याच्या विक्रीचा व्यवहार नातेवाइक आणि इतरांच्या सहकार्याने चुकीच्या पद्धतीने व्यवहार करण्यात आल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आलेला  आहे. कारखान्यावर धाड टाकताना याच्या खरेदी सहभागी असलेले औरंगाबादचे एक बिल्डर तसेच मालक यांच्या संबंधित ठिकाणीही ईडीने छापेमारी केली होती, अशी माहिती देण्यात आली होती. या प्रकरणी ही पहिलीच कारवाई असून, अर्जुन खोतकर यांच्यासह या व्यवहारात सहभागी असलेल्या सर्वांना हा मोठा धक्का बसला  मानला जात आहे.

ईडीच्या कारवाईनंतर गुवाहाटीला जाणार का?

ईडीच्या कारवाईच्या वृत्तानंतर अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया समोर येत आहे. ईडीने कारखान्यावर नेमकी काय कारवाई केली माहिती नाही आणि  मुंबईहून नाशिकला जात असताना मला ही माहिती मिळाली. अनेकांचे याबाबतीत मला फोन येत आहेत. तिथे गेल्यावर नेमकी माहिती मिळू शकेल आणि त्यानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करेन. काय ती कायदेशीर लढाई लढू, असे खोतकर म्हणाले आहे. यावेळी ईडीच्या कारवाईनंतर आता गुवाहाटीला जाणार का, असा प्रश्न अर्जुन खोतकर यांना विचारण्यात आला, त्यावर बोलताना, काय बोलता तुम्ही. असे काहीच होणार नाही, असे खोतकर या वेळी म्हणाले म्हणाले.

Leave a Comment