आसाम राज्यात पूर आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत - डिजिटल शेतकरी

आसाम राज्यात पूर आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत

आसाम राज्यात पूर आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झालेले दिसत असते. यामुळे आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला असून साडे 7 लाखांहून अधिक नागरिकांना पुराचा मोठा फटका बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या 25 लोकांपैकी 20 लोक पुरामुळे तर 5 लोकांचा भूस्खलनात मृत्यू झालेला आहे. शेजारील राज्यांनाही पूर आणि भूस्खलनाचा फटका  मोठ्या प्रमाणात बसला आहे.

काँग्रेसचा केंद्रावर आरोप

रिपोर्टनुसार, राज्यातील नागाव परिसराला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून, तेथे 3.5 लाख पेक्षा अधिक  लोक संकटाचा सामना करत आहेत. सध्या राज्यात 1710  गावे पाण्याखाली गेली असून 82507  हेक्टर क्षेत्रावरील पिके नष्ट झाली आहेत. दरम्यान, या परिस्थितीवरुन काँग्रेसने केंद्र सरकारला घेरण्यात आले आहे. भाजप सरकारने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत मिळणाऱ्या मदत रकमेपासून आसामला वंचित ठेवल्याचा आरोप काँग्रेसने करण्यात आला आहे.

आसामला निधीपासून वंचित ठेवले

आसाममध्ये काँग्रेस नेते मनजीत महंता यांनी केंद्र सरकारवर आरोप केला की, एनडीआरएफ अंतर्गत गुजरातला 2021-22 मध्ये एक हजार कोटी रुपये मिळाले, पण आसामला एक पैसाही दिला गेला नाही हे दुर्दव्य आहे. भाजपच्या कार्यकाळात 2018-19 आणि 2019-20 या वर्षात केंद्राकडून आसामला काहीही पेसे  दिले गेले नाही. 2020-21 मध्ये आसामला केवळ 44.37 कोटी रुपये मिळाले, अशी टीका कॉंग्रेस नि केली आहे.

रेल्वेनेही गाड्या रद्द केल्या

आसाममध्ये संततधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे भारतीय रेल्वेने राज्यातील गाड्या ह्या पूर्ण  रद्द केल्या आहेत. आसाममध्ये रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत काही रूळ पाहून गेले आहे. त्यामुळे रेल्वेने जून महिन्यापर्यंत गाड्यांच्या वाहतुकीवर पूर्ण पणे  बंदी घातली आहे. ईशान्य फ्रंटियर रेल्वेच्या लुमडिंग विभागात पाणी साचल्याने आणि दरड कोसळल्यामुळेही हा निर्णय रेल्वे णे  घेण्यात आला आहे. त्यामुळे त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर या शेजारील राज्यांतील रस्ते आणि रेल्वे मार्ग पूर्णपणे तुटला  गेला आहे.

 

Leave a Comment