लागवड
अडुळसा हे सदैव हिरवेगार असणारे, दोन ते तीन मीटर उंच वाढणारे हे झुडूप वाढत असते. पाने हिरवी, लांबट, वर्तुळाकार, टोकाकडे निमुळती होत गेलेली हि वनस्पती आहे. मध्यम आकाराचे, झुडपाचे सोटमूळ हे लांब लचक वाढते. खोडाला फांद्या समोरासमोर येतात व पेर फुगलेली दिसतात. फुले हि पांढरी रंगाची असतात फळे टोकाला लागतात.
लागवड
याची लागवड पावसाळ्यात करावी, कुंपणाच्या कडेला, शेतजमिनीच्या बांधावर 1 x 1 मीटर अंतरावर याची लागवड करता येत असते. शेतात ६० x ७० सें.मी. अंतरावर लागवड करावी.या वनस्पतीवर रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव जास्त आढळून येत नाही. पानांची किंवा फुलांची काढणी गरजेनुसार झाडाच्या पानाच्या प्रमाणानुसार करत असतात. साधारणतः तिसऱ्या महिन्यापासून पाने काढणीसाठी तयार होत असतात. त्यानंतर एक ते दोन महिन्यांच्या अंतराने छाटणी हि करून घावी. छाटणी केल्यानंतर पाने, फांद्या, फुले हे सावलीत वाळवण्यासाठी घालावी. संपूर्ण वाळल्यानंतर त्याची पावडर करतात. यामध्ये कटू गुण असल्याने यावर बुरशीचा प्रादुर्भाव जास्त होत नाही.
3 thoughts on “अडुळसा वनस्पती 2023”