Goat Rearing : शेळ्यांच्या आहार व्यवस्थापनात या गोष्टी महत्वाच्या 2022 - डिजिटल शेतकरी

Goat Rearing : शेळ्यांच्या आहार व्यवस्थापनात या गोष्टी महत्वाच्या 2022

Goat Rearing: शेळ्यांना द्यावयाच्या आहारामध्ये हिरवा चारा (Green Fodder), सुका चारा (Dry Fodder) व खुराक असे चाऱ्याचे वर्गीकरण होत असते. यातूनच सर्व महत्वाची जीवनसत्वे दिली जात असतात. एकूण आहारामधील कोरडा भाग म्हणजे ड्राय मॅटर (Dry Matter) हा खूप महत्वाचा असतो आणि चाऱ्यामधील सर्व पाणी काढून घेतल्यानंतर राहिलेल्या भागाला कोरडा भाग असे म्हंटले जाते. जीवनसत्वे ही कोरड्या भागात साठवलेली असतात या कोरड्या भागाचे प्रमाण हे प्रत्येक प्रकारच्या चाऱ्यामध्ये वेगळे असते, जसे की, लुसलुशीत हिरव्या चाऱ्यामध्ये ८० ते ९१  % पाणी असते त्यात कोरडा भाग १० ते २० % असतो. तर सुक्या चाऱ्यामध्ये फक्त १० % पाणी असते व कोरडा भाग जवळपास ९० % असतो. शरीराच्या सर्व गरजा या चाऱ्यातील कोरड्या भागावर अवलंबून असतात आणि त्यानुसारच आहाराचे व्यवस्थापन करावे लागते.Goat Rearing

शेळ्यांना विविध प्रकारचा झाडपाला आवडतो आणि झाडांची कोवळी पाने, कोवळ्या फांद्या व शेंगा त्या आवडीने खातात. शेळीला तिच्या वजनाच्या ३ ते ४ टक्के शुष्क पदार्थ खाद्यातून मिळणे आवश्यक असते आणि या दृष्टीने एका प्रौढ शेळीला दररोज साधारण ३ ते ४ किलो हिरवा चारा, ७५० ग्रॅम ते १ किलो वाळलेला चारा व प्रथिनांच्या पूर्ततेसाठी २०० ते २५० ग्रॅम संतुलित आहार प्रतिदिन द्यावा तसेच कारण १५ किलो वजनाच्या पुढे १०० ग्रॅम कडबा कुट्टी किंवा वाळलेला चारा द्यावा व तो पुढे प्रति ५ किलो वजनास ५० ग्रॅम याप्रमाणे वाढवत जावे. उदाहरणार्थ २० किलो वजनाच्या शेळीला १५० ग्रॅम.Goat Rearing

दूध देणाऱ्या शेळ्यांसाठी उपयुक्त खाद्य पुढील प्रमाणे तयार करावे.

मका ३७ %

शेंगदाणा पेंड २४ %

गव्हाचा कोंडा २० %

खनिज मिश्रण १ %

चुना २.५ %

मीठ ०.५ %

हरभरा १५ %

वरील संतुलित आहारामध्ये १८ % प्रथिने आणि ७५ % एकूण पचनीय घटक आढळत असतात.

पैदाशीचे बोकड आणि शेळ्यांसाठी संतुलित आहार तयार करण्याचे सूत्र खालील प्रमाणे.

गव्हाचा किंवा तांदळाचा भुसा ४५ %Goat Rearing

शेंगदाण्याची पेंड २० %

मका किंवा ज्वारी १२ %

साखरेची मळी १० %

डाळीचा भरडा १० %

मीठ १ %

चुना १ %

वरील संतुलित आहारामध्ये पंधरा % प्रथिने आणि ६५ ते ७२  % एकूण पचनीय घटक आहेत.

हे हि वाचा :कांद्याचे दाचे बाजार भाव घटते क्षेत्र, वाढती चिंता,

 

डिजिटल शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment