gold price: सोन्याचा भाव 65 हजार रुपयांवर जाणार? आठवडाभरात अडीच हजारांनी वाढ - डिजिटल शेतकरी

gold price: सोन्याचा भाव 65 हजार रुपयांवर जाणार? आठवडाभरात अडीच हजारांनी वाढ

gold price: अमेरिका-युरोपमधील बँकिंग संकट आणि शेअर बाजारातील (Stock market) उलथापालथ यामुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत चालत आहेत. त्यामुळे जागतिक बाजाराबरोबरच एमसीएक्स आणि देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याची चमक आणखी वाढली आहे तसेच गेल्या आठवडाभरात तर सोन्याच्या भावात २ हजार ५०० रुपयांची वाढ झाली आहे. चांदीदेखील आठवडाभरात ५ हजार २०० रुपयांनी वधारून ती ६७ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. सोन्याच्या भावात पुढील दिवसांत मोठी वाढ होत ते ६५ हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली जात आहे.

चांदीतही पाच हजार रुपयांची वाढ

silver गेल्या महिन्यात ५६ ते ५७ हजार रुपयांदरम्यान असलेले सोन्याचे भाव शुक्रवारी जळगावमध्ये ५८ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहेत तसेच चांदीदेखील आठवडाभरात ५ हजार २०० रुपयांनी वधारून ती ६७ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.gold price

का वाढेल भाव?

बाजारात सुरू असलेल्या अस्थिरतेमुळे सोन्याला मागणी वाढत आहे आणि यामुळे या वर्षाखेरीस सोन्याचा दर ६५ हजार रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो, असे तज्ज्ञांनी म्हटले जात आहे.

गेल्या महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर भाव कमी-कमी होत गेले मात्र आता जागतिक अस्थिरतेमुळे भाववाढ होऊ लागली आहे.silver

हे हि वाचा : शेतकऱ्यांना कमी दरात वीज मिळणार, ‘हे’ काम लवकरच पूर्ण होणार..

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment