vegetables : शेतकर्याना चागले दिवस  भाजीपाला महागला; शेवगा सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर 2022 - डिजिटल शेतकरी

vegetables : शेतकर्याना चागले दिवस  भाजीपाला महागला; शेवगा सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर 2022

बाजार भाव पितृपक्ष सुरू होताच भाजीपाल्याचे(vegetables )दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. शेवगा शेंगाचे दर एका आठवड्यात दुप्पट झाले आहेत तसेच होलसेल मार्केटमध्ये शेवगा १०० ते १५० रुपयांवर किरकोळ मार्केटमध्ये २४० रुपये किलोवर पोहोचला आहे. ढेमसे, वाटाण्याचे दरही प्रचंड प्रमाणात वाढले आहेत.

tomato

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये(vegetables ) सोमवारी ७४५ वाहनांमधून तब्बल ३,६३५ टन भाजीपाल्याची आवक झाली असून, त्यामध्ये ५ लाख ७० हजार जुडी पालेभाज्यांचा यात  समावेश आहे. गणेशोत्सवामध्ये भाजीपाला स्वस्त झाला होता परंतु  पितृपक्ष सुरू होताच भाव पुन्हा वाढू लागले आहेत. एक आठवड्यापूर्वी(vegetables ) होलसेल मार्केटमध्ये शेवगा शेंग ४० ते ७० रुपये किलो दराने विकली जात होती टेच दर आता सोमवारी हे दर १०० ते १५० रुपये झाले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये शेवगा २०० ते २४० रुपये किलो दराने सद्या  विकले जात आहे. शेवगा सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर सध्या  गेला आहे. फरसबी, वाटाणा, गवार, टोमॅटो, यांचे दरही वाढले गेले आहेत.

पालेभाज्यांचे(vegetables )दरही वाढले

पालेभाज्यांचे दरही दोन दिवसांपासून वाढले आहेत तसेच  किरकोळ मार्केटमध्ये कोथिंबिर  जुडी  ३० ते ४० रुपये, मेथी ३० ते ३५ रुपयांवर गेली आहे.  तसेच पुढील एक महिना भाज्यांचे दर तेजीत राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे हि वाचा : पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; कोकणसह पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट

 

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

Leave a Comment