Rain :पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; कोकणसह पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट 2022 - डिजिटल शेतकरी

Rain :पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; कोकणसह पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट 2022

मुंबई : हवामान अंदाज( Rain)  बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भासह मराठवाड्यावर पुन्हा एकदा ( Rain)पावसाचे ढग जमा झाले असून, या प्रदेशांसह लगतच्या परिसरांत पावसाचाजोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली गेली आहे, तर कोकणातही पावसाचा जोर वाढणार असून,  आज पासून १२ सप्टेंबरला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांना, तर १३ सप्टेंबरला रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात येत आहे.

Weather Update

१२ आणि १३ सप्टेंबरला कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस( Rain)पडेल आणि  किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहील. मध्य महाराष्ट्रात घाट भागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल आणि बहुतांश ठिकाणी पावसाची जोरदार शक्यता आहे. १५ सप्टेंबरपर्यंत कोकण,  गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून, किनारी भागात सोसाट्याचा वारा देखील वाहणार आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासांत कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार( Rain), तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आणि  कोकण, गोवा आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.

पुढील चार ते पाच दिवस मान्सून( Rain) राज्यात सक्रिय राहील तसेच  राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

– कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, हवामान खाते

हे हि वाचा : पिकात अतिरिक्त पाणी साचल्याचे परिणाम व उपाय काय आहे जमिनीत जास्त पाणी झाल्यास काय कराल

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

1 thought on “Rain :पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; कोकणसह पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट 2022”

Leave a Comment