तरुण वर्गातील सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. भारत सरकारच्या मंत्रालये, विभाग, एजन्सी व संस्थांमध्ये गट ‘अ’, ‘ब’ ‘क’ अंतर्गत 20,000 पदांसाठी नोकर भरती करण्यात येत आहे आणि या नोकर भरतीबाबत 17 सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
एसएससी-सीजीएल (SSC CGL recruitment) भरतीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर झालेले, तसेच 1 जानेवारी 2022 रोजी 18 ते 32 वर्षे वयोमर्यादा पूर्ण करणारे उमेदवार या नोकर भरतीसाठी अर्ज करू शकत आहेत. या पदभरतीबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे पहा :
एसएससी सीजीएल भरती- 2022
रिक्त जागा – 20,000
ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात – 17 सप्टेंबर 2022
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑक्टोबर 2022
वयोमर्यादा – 18 ते 32 वर्षे
पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
पगार – 7600 ते 1,51,100 रुपये दरमहा
निवड प्रक्रिया – या भरतीसाठी निवड प्रक्रिया टियर-1 आणि टियर- 2 परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://ssc.nic.in/
मूळ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.