सतत पडणारा पावसामुळे जमिनीला वाफसा(Crop Protection) होत नाही. सध्या मध्ये काही वेळा कडक उन्हे पडताना दिसत आहे. या तीव्र उन्हामुळे (Temperature) माती तापून त्यातील ओलावा उष्ण वाफेच्या स्वरुपात बाहेर पडत असतो. या वाफेचा आघात प्रथम वनस्पतींच्या मुळांवर (Plant Root) होत आहे. मुळे कोमजून मातीतून अन्नद्रव्यांची (Soil Nutrient) उचल खंडीत होत असते. परिणामी नांवर विविध अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे व विकृती दिसू लागत आहे. परिणामी फुल व फळगळ(Crop Protection) दिसून येत आहे.
अशा वेळी त्यापासून बचावासाठी केवळ फवारणी किंवा खते देण्याचे नियोजन कोणत्याही अभ्यासाविना शेतकरी करत आहेत. त्यामुळे केवळ खर्चातच वाढ (Crop Protection) होते असे नाही, तर उत्पादनातही घट होत आहे. पुढील प्रकारे काही उपाययोजना किंवा टीप्स बहुतांश शेतकऱ्यांना सर्व पिकांमध्ये राबवता येतील, असे मला वाटत आहे.
१) बुरशीनाशकांची फवारणी(Crop Protection) करण्यापूर्वी पाण्याचा सामू हा ५.५ ते ६.५ च्या दरम्यान करून घ्यावा लागतो. त्यानंतर त्यात बुरशीनाशक योग्य प्रमाणात मिसळून सकाळच्या वेळी फवारणी करणे उत्तम.
२) अशाच प्रकारे पाण्याचा सामू ५.५ ते ६.५ करून घेतल्यानंतर त्यात कीटकनाशक (Crop Protection) मिसळून त्याची फवारणी सायंकाळी करावी आणि सायंकाळी बहुतांश किडीच्या अवस्था अधिक कार्यरत होत असते त्यांचे नियंत्रण होण्यास मदत होते.
३) विनाकारण एकापेक्षा जास्त रसायने एकत्र फवारणे टाळावे.
४) उच्च गुणवत्तेचे व्हर्मीवॉश (गांडूळ पाणी) व काळा गूळ यांची एकत्रित फवारणी(Crop Protection) केल्यास पानांना मुख्य व दुय्यम अन्नद्रव्ये उपलब्ध होतात तसेच पानांची रोगप्रतिकारक शक्ती वाढून फुलगळ थांबता येते.
५) एकापेक्षा जास्त रसायने एकत्र करताना त्यांची कॉम्पटॅबिलिटी माहित करून घ्यावी आणि तसेत त्यातील कोणते पहिले मिसळायचे आणि कोणते दुसरे मिसळायचे, हे माहीत असणे फार गरजेचे आहे.
उदा : बोर्डो मिश्रण तयार करताना आपण प्रथम पाण्याचा सामू काढून त्यात मोरचूद मिसळावे आणि त्यानंतर चुना मिसळावा. योग्य पद्धतीने मिश्रण तयार केले तर चांगले परिणाम मिळत असतात.
६) शक्यतो लागवडी पूर्वी शेतात पाणी साचू नये, या उद्देशाने मशागतीवेळीच मातीला उतार करून घ्यावा लागतो. पुढेही पावसाचे साचलेले पाणी वेळीच बाहेर काढून द्यावे आणि यामुळे लवकरात लवकर वाफसा होण्यास मदत होईल.
७) शेतीचे सर्वच बांध विशेषतः (Crop Protection) उताराकडील बांध मजबूत असावेत आणि या बांधावर गवत असू द्यावे. गवताच्या मुळांचे जाळे जास्तीत जास्त घट्ट असणे फार गरजेचे असते. त्यामुळे शेताच्या बांधावर कधीही तणनाशकांची फवारणी करू नका. असे केल्याने बांध ठिसूळ होत असतात. अति पावसामध्ये पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ शकतात आणि या पाण्यासोबतच शेतातील सूक्ष्मजीवयुक्त माती वाहून जाऊन आपली माती निकस बनत असते.
८) ठिबक संचाचा वापर करताना लॅटरलमधील पाणी तापलेले असताना सिंचन करू नये आणि एका ड्रीपरपासून दुसऱ्या ड्रीपरपर्यंत पाइपच्या आकारमानानुसार ६० ते १०० मिलि गरम पाणी साचत असते. हे (Crop Protection) गरम पाणी पिकांच्या कोवळ्या मुळांवर अल्प कालावधीमध्येही आघात करत असते. त्यामुळे शक्यतो सकाळ लवकर पाणी व पाइप थंड असतानाच पाणी द्यावे. तसेच झाडेही सकाळी कार्यरत होतानाच पाणी व अन्नद्रव्ये उपलब्ध झाल्यास उचल चांगली होत असते.
९) रासायनिक खतांचा वापर माती परीक्षण करून समतोल प्रमाणात करणे हिताचे ठरत आहे. अनेकवेळा मातीत मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्ये उपलब्ध असतात, तरी आपण अजाणतेपणाने खतांचा पुरवठा करतच असतो. याचा परिणाम अन्नद्रव्यांची उचल होण्यावर फार होत असतो.
१०) मातीत सूक्ष्मजीव मुख्य व दुय्यम अन्नद्रव्याच्या विघटन आणि उपलब्धतेमध्ये मोलाची भूमिका निभावत असतात. अशा उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या वाढवण्याची नितांत गरज असते आणि त्यासाठी सेंद्रिय खते किंवा कंपोस्ट शेणखत वापरणे चागले असते.
११) पावसाळ्यात पिकांना (Crop Protection) जिवामृत देणे हिताचे ठरत आहे आणि आपण जेवण केल्यावर ते पचवण्याचे काम लाळग्रंथी व पचनसंस्थेतील सूक्ष्मजीव करत असतात. त्याच प्रमाणे शेतातील रासायनिक खते पचवण्याचे काम अल्प कालावधीमध्ये विघटन करण्याचे काम सूक्ष्मजीव करत असतात त्यांचे प्रमाण जीवामृतामध्ये अधिक असते. परिणामी खर्चात बचत होऊन उत्पादनात वाढ होते.
१२) बऱ्याच वेळा पावसाळ्यात रासायनिक घटकांच्या फवारण्या घेणे शक्य होत नाही आणि अशा वेळी जैवक घटकांची फवारणी उपयोगी ठरते. उदा ः ट्रायकोडर्मा
दत्तात्रय ढिकले, ९९२२३८१४३६
(प्रगतीशील शेतकरी व अध्यक्ष, ॲग्री ऑर्गेनिक रिसर्च फौंडेशन,
पिंपरी सय्यद, ता. जि. नाशिक.)
हे हि वाचा : नव्या कापसाला मिळतोय चांगला १२ हजाराचा दर
1 thought on “Crop Protection : अतिपावसात फळबागेची घ्यावयाची काळजी 2022”