heart attack: गेल्या काही वर्षांत देशात अचानक झालेल्या मृत्यूच्या घटनांनी लोक हैराण झाले आहेत आणि डॉक्टर आणि ICMR सारख्या संस्था देखील याचे कारण काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.. याच दरम्यान, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीवरून समोर आले आहे की, 2022 मध्ये सुमारे 57 हजार लोकांचा अचानक मृत्यू झाला आहे. यापैकी 57 टक्के प्रकरणे अशी होती ज्यात लोकांना हार्ट अटॅक आला होता आणि NCRB नुसार, अशा प्रकारे 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये अचानक मृत्यूच्या घटनांमध्ये 12 टक्क्यांनी वाढ झाली गेली आहे.
एनसीआरबी राज्य पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वार्षिक अहवाल तयार करत असते. आकस्मिक मृत्यूंमध्ये अशी प्रकरणे आहेत ज्यात पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नाही आणि पोलीस आकस्मिक मृत्यूंना अनपेक्षित मृत्यू मानतात, ज्यामध्ये व्यक्तीचा मृत्यू हिंसेव्यतिरिक्त इतर गोष्टींमुळे झाला आहे. जर आपण अचानक मृत्यूच्या कारणाबद्दल बोललो तर, हार्ट अटॅक शिवाय ब्रेन हॅमरेज हे देखील एक प्रमुख कारण झाले आहे. गेल्या महिन्यात एका अभ्यासात असे सांगण्यात आले होते की, अचानक होणारा मृत्यू आणि कोरोना लस यांचा काहीहि संबंध नाही.heart attack

heart attack कोरोनाची लस घेणारे लोक आकस्मिक मृत्यूचे बळी ठरत आहेत अशी चर्चा होत होती. त्यानंतर ICMR ने अशा प्रकरणांचा अभ्यास केला आणि अहवालात हे चुकीचे असल्याचे आढळले आहे. आरोग्यमंत्र्यांनी अलीकडेच सल्ला दिला होता की ज्यांना कोरोना आहे त्यांनी काही वर्षे जास्त मेहनत आणि हाय इन्टेन्सिटी असलेला व्यायाम करू नका. NCRB म्हणते की, 2022 मध्ये एकूण 3.9 लाख मृत्यूंपैकी 13.4 टक्के मृत्यू अचानक झाले आणि यातील एक तृतीयांश लोक 45 ते 60 वयोगटातील आहेत.
heart attack गेल्या वर्षी अचानक होणाऱ्या मृत्यूची संख्या ही महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 14,927 एवढी होती. याशिवाय केरळमध्ये 6,607 आणि कर्नाटकात 5,848 लोकांच्या मृत्यू झाला आणि आजारामुळे किंवा घरी अचानक हार्ट अटॅक आल्याने लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटनांची पोलिसांत नोंद होत नाही. त्यामुळे हा आकडाही कमी असू शकत आहे. गेल्या वर्षीही या राज्यांची क्रमवारी अशीच होती तसेच आकडेवारी दर्शवते की 2022 मध्ये हार्ट अटॅकने 32,410 मृत्यू झाले आहे.
संदर्भ : मराठी वृत्त पत्र लोकमत
झालं, श्वास घ्यायला त्रास होतो? १ सोपा उपाय करा- १० मिनिटांत नाक मोकळं होईल
शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp चॅनल फॉलो करा. फॉलो नसेल होत तर Whatsapp अपडेट करा

1 thought on “heart attack | देशात अचानक होणारे मृत्यू 12 टक्क्यांनी वाढले; हार्ट अटॅकसोबतच ‘ही’ गोष्ट ठरतेय कारणीभूत”