अनेक राज्यांत मुसळधार 2022 - डिजिटल शेतकरी

अनेक राज्यांत मुसळधार 2022

मुंबई : अनेक राज्यांत मुसळधारराज्यात उशिरा दाखल झालेल्या पावसाने जुलैमध्ये दाणादाण उडवली टाकली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कोसळधारांनी गुरुवारी थोडीशी उसंत घेतल्याने पूरस्थिती ओसरल्याचे चित्र दिसत  होते. विदर्भात मात्र पावसाचा जोर कायम राहणार आहे. नागपूर, चंद्रपूर तसेच गडचिरोली जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. पुरात भंडारा येथील एक आणि गडचिरोली येथील एक असे दोन जण वाहून गेले आहे.

मराठवाड्यात पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने बहुतांश धरणे व प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. प. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत दिवसभर रिपरिप चालू आहे तर काही टिकाणी उघड झाप चालू आहे. कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा जोर ओसरला काहीसा दिसत  आहे. तसेच अमरावती, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात संततधार सुरू आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात मुसळधार बरसल्याने प्रकल्पातील काही रस्ते वाहून गेल आहे. सेमाडोह येथे १० जुलै रोजी तब्बल २६४ मिमी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आलीली  आहे. अकाेला जिल्ह्यातील पिंपळडोली येथील निर्गुणा नाल्याला आलेल्या पुरामुळे पूल वाहून गेला असून, आदिवासीबहुल ११ गावांचा संपर्क तुटला या ठिकाणी तुटला आहे आणि  कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे.

अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस

देशभरात अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आला आहे आणि  गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तसेच केरळ या राज्यांना पावसाचा तडाखा बसला आहे. गुजरातमध्ये पूरस्थिती अतिशय गंभीर असून, २४ तासांमध्ये मुसळधार पावसाने १७ जणांचा मृत्यू झाला आहे आणि  अहमदाबाद-सूरत महामार्ग बंद असून, मुंबई व नागपूरला जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे

चंद्रपूर

वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, शिरना, इरई, उमा या नद्यांना पूर आल्यामुळे अनेक गावे पुराने वेढले  आहेत. जिल्ह्यात दीड हजारांहून अधिक घरांची पडझड झाली आहे आणि याशिवाय अनेक मार्ग बंद असल्याने ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले आहे.

दोन दिवसांपासून वर्धा नदीचे पाणी

बल्लारपूर-राजुरा, कोठारी-कवडजई, काटवली-बामणी, विसापूर-नांदगाव पोडे, बल्लारपूर-विसापूर, पळसगाव-कवडजई, हडस्ती- चारवट, चारवट- माना-चंद्रपूर, बल्लारपूरकडून वस्ती विभागाकडे जाणारा गोलपुलिया मार्ग पूर्ण बंद झाला आहे. असे असले तरी काही ठिकाणी पर्यायी मार्ग आहेत आणि  वस्ती विभागात वर्धा नदीवरील गणपती घाट पाण्याखाली आला असून नदीचे पाणी विसापूर रस्त्यापर्यंत आले आहे. बल्लारपूर पोलिसांनी बामणी-राजुरा मार्गावर तसेच अनेक ठिकाणी पोलिसांची चमू तैनात केली गेले आहे. बामणी मार्गावर रस्त्याच्या आजूबाजूला दोन किलोमीटरपर्यंत ट्रकची  रांग लागल्याचे गुरूवारी दिवसभर दिसून आले आहे.

डोलारा तलावातील अनेक घरे पाण्यात भद्रावती तालुका तथा शहरांमध्ये पावसाने हाहाकार माजवला असून डोलारा तलावातील अनेक घरे पाण्याखाली गेलेली दिसत  आहे आणि  तसेच पिंडोनी तलाव भरून वाहत आहे.

 

ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावे प्रभावित

– ब्रह्मपुरी तालुक्यातील शेवटच्या टोकावरील लाडजपासून पिंपळगाव, अर्हेर, चिखलगाव, भालेश्वर, हरदोली, चिंचोली, पारडगाव, बेटाळा, बोढेगाव, खरकाडा, (पिंपळगाव), नवेगाव, झीलबोडी, बेलगाव, मांगली, किन्ही, जुगनाळा,  आणि रणमोचन या सर्व गावांना पुराचा फटका बसला आहे. गांगलवाडी-आवळगाव – मुडझा – व्याहाड मार्ग बंद झाला आहे आणि  असाच पाऊस राहिला तर लाडज हे गावच पाण्याखाली येऊ शकते.

चंद्रपूर – अहेरी मार्ग बंद

– वैनगंगा नदीला पूर आल्याने गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या आष्टी पुलावरून पाणी ओसंडून वाहत आहे आणि अनेक धरणांचे पाणी सोडल्याने गुरुवारी सकाळपासूनच चंद्रपूर-अहेरी मार्ग बंद आहे..

Leave a Comment