आजचे राशिभविष्य(HOROSCOPE) 28-08-2022 - डिजिटल शेतकरी

आजचे राशिभविष्य(HOROSCOPE) 28-08-2022

🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..(HOROSCOPE)

मेष (Aries): आजचे राशिभविष्य नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार मनात येऊ शकतो किंवा त्याला प्रत्यक्षात आणता येईल आणि  आज भाग्य तुम्हाला साथ देईल. कौटुंबिक आनंद चांगला राहणार आहे आणि आज तुम्ही आनंदी असाल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल आणि वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल आणि खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृषभ (Taurus): आजचे राशिभविष्य कामात जैसे थे परिस्थिती राहील आणि काही जबाबदार्‍या नव्याने वाढतील. आवडी निवडीबाबत आग्रही राहाल आणि कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्याल. चटपटीत पदार्थ खाण्याची हौस पूर्ण होईल आणि संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. आजचा दिवस हसत-खेळत घालवाल आणि निर्णय योग्य ठरतील. आर्थिक लाभ होतील आणि प्रॉपर्टीचे प्रस्ताव येतील.

मिथुन (Gemini) : आजचे राशिभविष्य आज भावंडांमधे सामंजस्य राहील आणि गृहीणींना शेजारधर्म पाळावे लागणार आहेत. बेरोजगारांना रोजगार मिळेल आणि कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरले. चार चौघात मिळून मिसळून वागाल.गुरुकृपा लाभेल आणि एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आणि व्यवसायात वाढ होईल.

कर्क (Cancer) : आजचे राशिभविष्य प्रवास-करमणूक आणि लोकांमध्ये मिसळणे हाच तुमच्या आजच्या दिवसाचा विषय आहे आणि तुमचा जोडीदार हा देवदूतच आहे आणि याची आज तुम्हाला जाणीव होईल. सर्वांशी तोंडात साखर ठेवून वागाल आणि व्यवसायातील आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत. मनोबल वाढेल आणि आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल आणि मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

सिंह (Leo) : आजचे राशिभविष्य कोणत्याही विवाह समारंभात किंवा मंगल समारंभात सहभागी व्हाल आणि मनामध्ये आनंद राहील. या दिवशी तुम्ही तुमच्या ज्येष्ठांचा आणि सज्जनांचा आदर करण्यात आघाडीवर असाल आणि महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. संततिसौख्य लाभेल आणि तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काही कामे धाडसाने पार पाडाल आणि गुरुकृपा लाभेल.

कन्या (Virgo) : आजचे राशिभविष्य नवीन ओळखीतून मैत्री वाढेल आणि हौस पूर्ण करून घ्याल. मेहनतीचे फळ आज नक्कीच मिळेल आणि एखाद्या खास व्यक्तीशी झालेली भेट संस्मरणीय राहील. जिद्द व चिकाटी वाढेल आणि खर्चाचे प्रमाण वाढेल. एखादी गुप्तवार्ता समजेल आणि गुरुकृपा लाभेल. अनेक दिवसांचे स्वप्न पूर्ण होईल आणि आईच्या हातच्या स्वादिष्ट भोजनाचा लाभ घ्या.

तुळ (Libra) : लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि कीर्ती मिळेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. या राशीच्या लोकांचे मन आज आनंदी राहील आणि कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल, प्रवासाचा आनंद घ्याल. बुध्दीचातुर्याने कामे मार्गी लागतील आणि व्यक्तिमत्वाचा प्रभाव राहिल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहिल आणि आज सहलीचा आनंद घ्याल.

वृश्‍चिक (Scorpio) : वरिष्ठांच्या सल्ल्याने तजवीज करावी आणि कौटुंबिक जबाबदारी वाढेल. तसेच काही खर्च देखील वाढतील. मानसिक गोंधळ दूर करावा आणि कामाचे नियोजन यशस्वी होईल. मनासारख्या घटना घडतील, नोकरी करणार्‍यांना लाभदायक दिवस ठरेल आणि पदोन्नतीचे योग संभवतात. शत्रुंवर विजय प्राप्त कराल.

धनु (Sagittarius) : तुम्हाला आज मानसिक शांततेचा अनुभव होईल आणि कामाचा आवाका लक्षात घ्या. क्षुल्लक गोष्टींमुळे कामे रेंगाळू शकतात आणि अडथळ्यातून प्रयत्नाने मार्ग काढावा. कौटुंबिक खर्च वाढू शकतो आणि अपयशाचा सामना करावा लागेल, व्यापारामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे, गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस आहे.

मकर (Capricorn) : व्यवसायात चांगला फायदा होईल आणि आजचा दिवस तुमच्यासाठी चांगली सुरुवात करणारा आहे. कुटुंबातील सदस्यांकडून आनंद आणि सहकार्य मिळेल आणि जे काम तुम्ही हातात घ्याल त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. संयमाने वागावे. कलागुणांना वाव मिळेल आणि व्यावहारिक सावधानता बाळगा. आज कामे पुढे ढकला आणि आर्थिक नुकसान टाळा.

कुंभ (Aquarious) : घरातील वातावरणात तुम्ही उपयुक्त बदल कराल आणि तुमच्या प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत अविश्वसनीय असा असणार आहे. कुटुंबावर आनंदाचा वर्षाव करा आणि अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका, आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. प्रसन्नता लाभेल. प्रयत्नांना यश मिळेल, कौतुकास्पद कार्य होऊन प्रसन्नता लाभेल.

मीन (Pisces) : आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे आणि नशीब तुमच्या सोबत आहे, कामात उत्साह राहील. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या क्षेत्रात यश मिळेल आणि तुमच्या इच्छेनुसार तुमच्या कामाच्या योजना पूर्ण कराल. आनंददायी दिवस जाईल आणि भाग्यकारक घटना घडतील. सुवार्ता ऐकायला मिळेल आणि दोन दिवसांत नव्या मित्रमंडळींची ओळख होईल.

हे हि वाचा : पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या घटली, नवीन यादीत तुमचं नाव ‘असं’ करा चेक

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

Leave a Comment