PM Kisan: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या घटली, नवीन यादीत तुमचं नाव ‘असं’ करा चेक 2022 - डिजिटल शेतकरी

PM Kisan: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या घटली, नवीन यादीत तुमचं नाव ‘असं’ करा चेक 2022

पीएम किसान (PM Kisan)योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत  आहे.. पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी 6 हजार रुपये वर्ग केले जात आहेत. प्रत्येकी दोन हजार, असे(PM Kisan) तीन हप्त्यांमध्ये हे पैसे वर्ग केले जात आहेत. आतापर्यंत या योजनेचा 11 हप्ते शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग करण्यात आलेले  आहेत.

Farmers

शेतकऱ्यांना 12व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली असताना, मोठी बातमी समोर येत आहे आणि हि बातमी पीएम किसान(PM Kisan) योजनेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे समोर आल्यानंतर मोदी सरकारने कडक भूमिका घेतली आहे. अपात्र शेतकऱ्यांकडून आतापर्यंत घेण्यात आलेल्या लाभाची(PM Kisan) रक्कम वसूल केली जात आहे.

तसेच, पात्र शेतकऱ्यालाच योजनेचा लाभ व्हावा, यासाठी येत्या 31 ऑगस्टपर्यंत ‘ई-केवायसी’ करणं बंधनकारक करण्यात आलं आहे आणि  मोदी सरकारच्या कडक धोरणामुळे गेल्या दोन हप्त्यांपासून या याेजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली गेली आहे आणि(PM Kisan) तसेच अनेक शेतकऱ्यांची नावे यादीतून गायब झाली आहेत..

लाभार्थ्यांच्या संख्येत घट

पीएम किसान योजनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या 12 कोटींहून अधिक जास्त आहे. त्यानंतर(PM Kisan) ऑगस्ट-नोव्हेंबर 2021-22 मध्ये एकूण 11 कोटी 19 लाख 25 हजार 347 शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता वर्ग केला आहे. तेव्हापासून या योजनेचा लाभ घेणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने घटच होत राहिली आहे.

गावोगावी लाभार्थींची पडताळणी व ई-केवायसीमुळे डिसेंबर-मार्च 2021-22 मध्ये 11 कोटी 14 लाख 92 हजार 273 शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली आहे. मे-2022 मध्ये 11 वा हप्ता वर्ग करण्यात आला होता आणि त्यावेळी, म्हणजेच एप्रिल-जुलै 2022-23 मध्ये हीच संख्या 10 कोटी 92 लाख 23 हजार 183 पर्यंत घसरली गेली आहे.

नवीन यादी अशी पहा

सर्वप्रथम पंतप्रधान किसान पोर्टल https://pmkisan.gov.in/ वर जा आणि  होम पेजवर मेन्यू बारवर ‘फार्मर कॉर्नर’ क्लिक करा व येथे लाभार्थी यादीवर क्लिक/टॅप करणे आहे.

राज्यातील ड्रॉप-डाउन मेन्यूमधून तुमचं राज्य निवडता येईल.

दुसऱ्या टॅबमध्ये जिल्हा, तिसऱ्या टॅबमध्ये तहसील किंवा(PM Kisan) उपजिल्हा, चौथ्यामध्ये ब्लॉक आणि पाचव्या क्रमांकावर तुमच्या गावाचे नाव निवडता येईल.

नंतर तुम्ही Get Report वर क्लिक करताच संपूर्ण गावांतील लाभार्थीची यादी तुमच्यासमोर दिसणार आहे. त्यात तुम्हाला तुमचं नाव चेक करता येणार आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांना आतापर्यंत 11 हप्ते मिळाले असून, आता 12 व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली गेली आहे. केंद्र सरकार येत्या 15 सप्टेंबरपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 12वा हप्त्याचे दोन हजार रुपये येणार असल्याचे सांगण्यात आले आहे..

हे हि वाचा :गुलाबी बोंडअळीला कसं रोखाल कसे कराल नियोजन? अश्या पद्धतीने नियोजन केल्यास बोंडअळी वर नियत्रण मिळवू शकता

 

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

6 thoughts on “PM Kisan: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या घटली, नवीन यादीत तुमचं नाव ‘असं’ करा चेक 2022”

Leave a Comment