आजचे राशिभविष्य - डिजिटल शेतकरी

आजचे राशिभविष्य

🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल आणि  नियमांना सोडून वागू नका. फसव्या मित्रांपासून सावध राहावे आणि घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. वडिलोपार्जित कामातून धनप्राप्ती होईल आणि कोर्टाची काम निघतील. जवळच्या माणसाची आरोग्याच्या तक्रारी जाणवतील आणि नोकरीत उच्चधिकार मिळतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील आणि नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल.

वृषभ (Taurus): दूरच्या व्यवहारात सावधानता बाळगावी आणि आततायीपणे वागून चालणार नाही. क्षुल्लक गोष्टींवर वाद घालू नका आणि कौटुंबिक जबाबदारी लक्षात घ्या. नवीन ओळखी वाढवाव्यात आणि धनलाभ होण्याची शक्यता. मन प्रसन्न राहील आणि नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण जाणवेल. पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल आणि आपली इच्छा असेल तर दिवास्वप्नही खरी ठरू शकतात. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल.

मिथुन (Gemini) : थोडी आक्रमक भूमिका घ्याल आणि स्त्री वर्गावरून वादाचा प्रसंग येऊ शकतो. कामात भावंडांची सहकार्य घेता येईल आणि तांत्रिक बाबींमध्ये बारीक लक्ष घालावे. हातातील कामे सुरळीत पार पडतील आणि बोलताना संयम बाळगा, धोका पत्करू नका. उत्पन्न स्थिर राहील. तुमच्या व्यवसायातील काही काम खूप दिवसांपासून रखडले असेल तर ते आज पूर्ण होऊ शकतात.

कर्क (Cancer) : काही वेळेस तारेवरची कसरत करावी लागू शकते आणि हातातील चांगली संधि सोडू नका. नियोजन करून कामे करावीत आणि प्रवासात भरकटू नका. वेळ वाया जाणार नाही याची दक्षता घ्या. व्यवसायात तेजी मिळेल आणि अधिक प्रयत्न करावे लागेल. स्वतः निर्णय घ्या, इतरांवर अवलंबून राहू नका आणि निरोगी पर्याय निवडल्याने तुमचे आरोग्य चांगले राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल.

सिंह (Leo) : दिवस समाधानात जाईल आणि होकारात होकार मिसळावा लागेल. प्रसंगातील अनुकूलता लक्षात घ्यावी. अचानक समोर आलेल्या कामातून लाभ संभवतो. कामातील दिरंगाई टाळावी आणि कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. नवीन जवाबदारी मिळेल आणि उत्पन्न स्थिर राहील. आनंद वाढेल. उत्साहजनक वार्ता मिळतील. लेखन कार्यात प्रगती होईल आणि आई-वडिलांकडून साथ लाभेल.

कन्या (Virgo) : आत्मसंयमन करावे लागेल आणि अति धाडस करायला जाऊ नये. स्वयं शिस्त पाळणे आवश्यक आहे आणि नियोजनबद्ध कामात सफल व्हाल. व्यावसायिक प्रवास सावधानतेने करावेत आणि नवीन नोकरी मिळेल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना विचार करा आणि कामाच्या ठिकाणी नवीन जवाबदारी मिळेल. आरोग्य उत्तम राहील आणि ‘देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा.

तुळ (Libra) : जोडीदाराला अचानक लाभ होईल आणि जवळच्या लोकांना दुर्लक्षित करू नका. बेफिकिरीने वागून चालणार नाही आणि कठोर परिश्रमास पर्याय नाही. जवळचा प्रवास घडेल आणि व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. गुंतवणूक करण्यासाठी शुभ दिवस, कुठलाही निर्णय घेतला घाई करू नका आणि अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक आणि वाहने काळजीपूर्वक चालवा.

वृश्‍चिक (Scorpio) : शक्यतो अकारण होणारे गैरसमज टाळावे लागतील आणि जोडीदाराशी मतभेद संभवतात. कोणत्याही गोष्टीची जास्त चिकित्सा करत बसू नका आणि प्रयत्नात कसूर करू नका. तुमच्या तिजोरीत भर पडेल. जुनी व्याधी पुन्हा त्रास देण्याची शक्यता आणि सामाजिक कार्यात मन लागेल. मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता. आज प्रेमप्रकरणी चुका होणार नाही याची दक्षता घ्या आणि घरातील मंडळींचे आदेश पाळा. .

धनु (Sagittarius) : आज मनाप्रमाणे वागण्याचे ठरवाल आणि खेळाडूंनी कसरतीत कसूर करू नये. थोड्याशा यशाने उतू नका. सारासार विचारावर भर द्या आणि मधुमेहींनी खाण्याची पथ्ये पाळावीत. जोडीदाराचे प्रेम मिळेल आणि विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस. उत्पन्न वाढेल आणि दुचाकी वाहन चालवताना सावधानता बाळगावी. स्वत:च्या मर्जीने दिवस घालवाल आणि ताणतणाव कमी करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा.

मकर (Capricorn) : दिवसभर कार्यरत राहावे लागेल आणि भाऊबंदकीत वाद संभवतात. वाहन चालवताना सतर्क रहा आणि जोडीदाराचा शब्द प्रमाण मानावा लागेल. घरगुती कामात व्यस्त राहाल आणि अतिरिक्त खर्च होतील. आरोग्याची काळजी घ्या आणि उत्पन्न स्थिर राहील. कामात सावधगिरी बाळगा आणि काहीसे हट्टीपणे वागाल. अधिकाराचा योग्य वापर करता आला पाहिजे आणि नसते साहस अंगाशी येऊ शकते.

कुंभ (Aquarious) : कामाच्या ठिकाणी चिडचिड वाढू शकते आणि एकमेकांच्या सहकार्याने कामे करावीत. परदेशी कामातून लाभ संभवतो आणि मोहाला बळी पडू नका. खिशाला कात्री लागणार नाही याची काळजी घ्यावी आणि नवीन योजना बनतील. कुटुंबीयांकडून सहकार्य आणि प्रेम मिळेल आणि वेळ अनूकूल असेल. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा आणि शत्रूंपासून सावध राहा. स्त्री पक्षाचा आधार मिळेल.

मीन (Pisces) : सध्याच्या परिस्थितीत बिनधास्त वागून चालणार नाही आणि अध्यापक वर्गावर जबाबदारी वाढू शकते आणि जोडीदारा सोबतचे वाद वाढू देऊ नका. वात विकार बळावू शकतात आणि मानसिक स्थैर्य जपावे. धर्मकार्यात मन लागेल. आरोग्याची काळजी घ्या आणि मन प्रसन्न राहिल. शत्रूंपासून सावध राहा आणि मित्रांच्या सहयोगाने कार्यांमध्ये सहजपणा राहील. शत्रूंवर प्रभाव वाढेल आणि स्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील.

Leave a Comment