आजचे राशीभविष्य 26-06-2022 - डिजिटल शेतकरी

आजचे राशीभविष्य 26-06-2022

मेष: राशीभविष्य चंद्र मेष राशीस स्थित आहे आणि  आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. राशीभविष्य आजचा दिवस आनंदोस्तव साजरा करण्याचा आहे आणि आजचा दिवस शारीरिक व मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगला जाईल.

वृषभ: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे आणि आपणास विविध चिंता सतावतील. स्नेही व नातलग ह्यांच्याशी मतभेद झाल्याने घरात विरोधी वातावरण निर्माण होईल.

मिथुन: आजचा दिवस व्यापारी वर्गासाठी शुभ फलदायी आहे आणि व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल. मित्रांकडून लाभ होतील आणि नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीमुळे आपल्याला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आणखी वाचा…

कर्क: आज गृह सजावटीवर आपण विशेष लक्ष द्याल आणि घरगुती वापराचे नवीन साहित्य खरेदी कराल. व्यापारी व नोकरदार लाभाची किंवा बढतीची अपेक्षा करू शकतात आणि कुटुंबात सुख – शांती नांदेल. सरकारी लाभ मिळतील.

सिंह: आज स्वभावात उग्रता व संताप असल्यामुळे काम करण्यात आपले मन लागणार नाही आणि वादविवादात आपल्या अहंकारामुळे कोणाची नाराजी ओढवून घ्याल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा…

कन्या: आज आपण एखादे काम हाती घेणे हिताचे ठरणार नाही आणि बाहेरचे खाण्यामुळे प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. क्रोधावर नियंत्रण ठेवण्यासाठी मौन हेच शस्त्र उपयुक्त ठरेल.

तूळ: आजचा दिवस प्रणय, प्रेमालाप, मनोरंजन व मौज – मस्ती करण्याचा आहे आणि सार्वजनिक जीवनात महत्व मिळेल. यश व कीर्ती वाढेल. भागीदारांशी लाभाच्या गोष्टी होतील आणि उंची वस्त्रे व अलंकार यांची खरेदी होईल.

वृश्चिक: आज अचानक काही घटना घडतील आणि ठरलेल्या भेटी रद्द झाल्याने निराश व क्रोधीत व्हाल. हाती आलेली संधी सुटून जात असल्याचे दिसेल आणि कुटुंबीयांशी मतभेद होतील. मातुला कडून एखादी अप्रिय बातमी मिळाल्याने मन व्यथित होईल.

 

धनु: आजचा दिवस मिश्र फलदायी आहे आणि पोटाच्या समस्या त्रास देतील. संततीचे स्वास्थ्य व अभ्यास ह्यामुळे चिंतित व्हाल. कार्य सफल न झाल्याने निर्माण होण्यार्‍या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल आणि प्रणयासाठी मात्र अनुकूलता लाभेल.

मकर: आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याने मन खिन्न होईल आणि शारीरिक स्फूर्ती, तरतरी ह्यांचा अभाव राहील. सार्वजनिक जीवनात मानहानी होण्याचा संभव आहे आणि छातीत दुखणे संभवते.

कुंभ: आज आपणास चिंतामुक्त झाल्याने जरा हायसे वाटेल आणि उत्साह वाढेल. वाडवडील व मित्र यांच्याकडून फायद्याची अपेक्षा ठेवू शकता. स्नेहसंमेलन किंवा प्रवासाच्या माध्यमातून कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवण्याची संधी मिळेल.

मीन: आज आपणास बोलण्यावर संयम ठेवावा लागेल आणि रागामुळे एखाद्याशी मतभेद होण्याची शक्यता आहे. शारीरिक कष्ट वाढतील आणि विशेषतः डोळ्यांकडे लक्ष द्यावे लागेल. कुटुंबीय व प्रियजन ह्यांच्याशी मतभेद संभवतात.

Leave a Comment