हवामान व लागवडीचा हंगाम
लसूण आपल्या देशात सपाट मैदानी भागात लसणासाठी उपयुक्त हवामान नोव्हेंबर ते एप्रिल महिन्यांदरम्यान उपलब्ध आहे. त्यामुळे देशभरात ९० टक्के लसणाची लागवड ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात होत असते. लसूण तापमानास संवेदनशील पीक असून भरपूर व दर्जेदार उत्पादनासाठी लागवडीचा योग्य हंगाम साधणे आवश्यक असते . महाराष्ट्रात लसणाची लागवड ऑक्टोबर महिन्यात करणे योग्य असते. लसूण हे पीक थंड हवेस प्रतिसाद देते आणि पण लसणाचा गडुा पक्व होत असताना व काढणीच्या काळात कोरडे हवामान आवश्यक असते. लसणाच्या पाकळ्या लावल्यानंतर पानाची वाढ होते व त्याची संख्या वाढत असते. हा काळ साधारणपणे ४६ ते ५० दिवसांचा असतो. या काळात रात्रीचे तापमान १२ ते १५ अंश सें.ग्रे. व दिवसाचे तापमान २४ ते २८ अंश सें.ग्रे च्या दरम्यान लागते. तसेच हवेत ७५ ते ८० टके आद्रता व ९ ते १२ तास सूर्यप्रकाश हवा. यानंतर पाकळ्या पोसू लागतात व गडुा आकाराने वाढू लागत असतो. हा कालावधी ३५ ते ४० दिवसांचा असतो. या काळात हवेतील आद्रता कमी व तापमान वाढलेले असतात. त्यामुळे पात वाळणे, गडुा सुकणे या क्रिया सुलभ होत असतात. महाराष्ट्रात लसणाची लागवड ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करायची असते. उशिरा लागवड झाली तर गड्यांचा आकार कमी होत असतो आणि वजन कमी भरते व उत्पादनदेखील कमी येते. थंड व पहाडी क्षेत्रात लावल्या जाणा-या जाती वेगळ्या आहेत. या जातीमध्ये १० ते १२ पाकळ्या असतात, परंतु प्रत्येक पाकळ्याचे वजन ४ ते ५ ग्रॅम च्यापेक्षा असल्यामुळे गडुा आकाराने मोठा असतो. या जाती महाराष्ट्रातील हवामानात जास्त येत नाहीत. केवळ पाने वाढतात व पाकळ्या तयार होत नसतात.
जमीन
लसणाचा गडुा जमिनीत पोसत असल्याने वाढीकरिता पाण्याचा उत्तम निचरा होणारी भुसभुशीत व कसदार जमीन लागत असते.
सुधारीत जाती
गेल्या १० ते १२ वर्षात निरनिराळ्या कृषि संशोधन केंद्रात अनेक वाण गोळा करून निवड पद्धतीने सुधारित वाण विकसित करण्याचे काम चालू असते. संशोधनातून गोदावरी (सिलेक्शन-२), श्वेता (सिलेक्शन-१०), अॅग्रेिफाऊंड व्हाईट (जी-४१), यमुना सफेद (जी-५०), जी-१, जी.जी.–२, जी-२८२, जी-३२३, फुले बसवंत, भीमा ओंकार इत्यादी जाती भारताच्या मैदानी भागाकरिता उपयुक्त ठरत आहेत. जी-४१ ही जात जांभळा करपा व तपकिरी करपा या रोगांचा प्रादुर्भाव नसणा-या क्षेत्रात चांगले उत्पादन देते व साठवणक्षमता सुध्दा चांगली असते.
ही जात पुणे, नाशिक, सातारा, अहमदनगर, इत्यादी भागासाठी उपयुक्त ठरत आहे. फुले बसवंत व गोदावरी ही जात जांभळ्या रंगाच्या लसूण लागवडीसाठी उपयुक्त ठरत असते. जी-५० या जातीत पाकळ्यांची संख्या 35 ते ४0 पर्यत असते.
कांदा व लसूण संशोधन संचालनालयाद्वारे विकसित केलेल्या लसणाच्या जाती खालील प्रमाणे
भीमा ओंकार
भीमा ओंकार ही जात भारतामध्ये (लसूण पीक घेत असणा-या) कोणत्याही भागात यशस्वीपणे वाढत आहे. विभाग ६ (गुजरात, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली) लसणाची ही जात अधिकतम उत्पादन आणि चांगली प्रत यासाठी प्रसिद्ध मानली आहे. प्रत्येक कांद्यामध्ये १९ ते २० पाकळ्या असतात. एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण ४१.३ टक्क्यांपर्यंत असते. मध्यम हिरव्या रंगाची थोडीशी अवतल पाने विविध क्षेत्रांमध्ये प्रायोगिक तत्वावर केलेल्या उत्पादनाच्या पाहणीनुसार उत्पादनाचे प्रमाण ९० ते १४o किंवटल प्रती हेक्टर पर्यंत असते.
भीमा परपल
विभाग ३ (दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा बिहार आणि पंजाब) आणि विभाग ४ (महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश) या विभागांसाठी भीमा परपलला मान्यता देण्यात आली/शिफारस करण्यात आलेली आहे. लसणाची ही जात अधिकतम उत्पादन आणि चांगली प्रत यासाठी प्रसिद्ध मानत आहे. मध्यम आकाराचा एकसंध जांभळट रंग असणारा, १७ ते २o कळ्या/ पाकळ्या असणारा कांदा (बल्ब) आहे. सरासरी उत्पादन ६.५० ते ७ टन प्रती हेक्टर एवढे असते.
बियाणे
लसणाची लागवड पाकळी लावून करत असतात. यासाठी सुधारित जातींचे शुद्ध व खात्रीलायक बेणे वापरत असतात. पाकळ्या वेगळ्या करताना वरच्या पापुद्रयाला अथवा पाकळ्यांना इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी. साधारणपणे १ ते १.५ ग्रॅम वजनाच्या पाकळ्या लागवडीसाठी लागवडीसाठी वापर करू नयेत. लहान पाकळ्या लावल्या तर गडु उशिरा तयार होतात व उत्पादन कमी मिळत असते. मागील हंगामात तयार झालेल्या थंड व कोरड्या जागेत साठवून पुरेशी विश्रांती मिळालेले मोठ्या आकाराचे गडु लागवडीसाठी निवडात असतात. एक हेक्टर क्षेत्र लसूण लागवडीकरिता पाकळ्यांच्या आकारानुसार ३50 ते ५oo किलोग्रॅम लसूण लागतात.
पूर्व मशागत, रानबांधणी व लागवड
उन्हाळ्यात खोल नांगरट करून २ ते ३ कुळवाच्या पाळ्या घालण्यात यावा. लसणाचे गडे जमिनीत पोसतात व त्यांची मुळे १५ ते २२ सें.मी. खोलीपर्यंत जात असल्याने जमिनीचा ३5 ते ४0 सें.मी. पर्यंतचा भाग भुसभुशीत असणे आवश्यक आहे. शेवटच्या कुळवणीच्या वेळी हेक्टरी २५ ते ३५ टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. लसणाची लागवड सपाट वाफ्यात केली जात असते. त्यासाठी जमिनीच्या उताराप्रमाणे ४ × २ किंवा ३ x २ मीटर अंतराचे सपाट वाफे तयार करून घ्या. जमिनीचा उतार जास्त असल्यास लहान आकाराचे सपाट वाफे तयार करून घ्या. जमीन सपाट असल्यास १.५ ते २ मीटर रुंद व ११ ते १२ मीटर लांब सरी वाफे तयार करून लागवडीसाठी वापरता येतात.
आंतरमशागत व तणनाशकाचा वापर
लसूण लागवडीनंतर सुरवातीच्या काळात रोपांची वाढ हळू हळू होत असते. तसेच दोन रोपातील अंतर कमी असल्याने खुरपणी करताना रोपांना इजा होण्याची भिती जास्त असते. सुरवातीस गवताचे रोप बारीक असल्याने खुरपणी उरकत नसत. अशा परिस्थितीत रासायनिक तणनाशकाचा उपयोग करणे व्यवहार्य ठरत आहे. लसणामध्ये तणाचे बी रुजून येण्यापूर्वी गोल, स्टॉप अथवा बासालिनसारख्या तणनाशकाचा वापर करता येत असतो. खुरपणीमुळे जमिनीचा वरचा भाग मोकळा होऊन हवा खेळती राहते व पीक उत्तम येत असते. लव्हाळा व हराळीचा बंदोबस्त पूर्वमशागतीनेच होत असतो. खोल नांगरट करून लव्हाळ्याच्या गाठी व हराळीच्या काशा वेचणे हा प्रभावी उपाय मानला आहे.
भरखते
. महाराष्ट्रातील जमिनीसाठी १oo-110 किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश प्रती हेक्टर देण्याची शिफारस आहे. ५०-६० टक्के नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश याची मात्रा पाकळ्यांची टोकण करण्यापूर्वी द्यावी. उरलेली नत्राची मात्रा दोन भागात किंवा हप्त्यात विभागून दिली पाहिजे. पहिली मात्रा लागवडीनंतर ३०-३५ दिवसाने व दुसरी मात्रा ४५ ते ५५ दिवसांनी द्यावी.त्यामुळे उत्पादन व साठवणीवर विपरीत परिणाम होत असतो. अलीकडेच करण्यात आलेल्या प्रयोगावरून कांदा व लसूण ही पिके गंधकयुक्त खतास प्रतिसाद देत असतात, असे दिसून आले आहे. म्हणून भरखते देताना अमोनियम सल्फेट व सुपर फॉस्फेट यासारख्या खतांचा उपयोग केल्यास आवश्यक गंधकाची मात्रा पिकास मिळत असते.
पाणी नियोजन
लसणाची मुळे जमिनीच्या १५ ते २० सें.मी. च्या थरात असतात आणि त्यामुळे वरच्या थरात ओलावा कायम असणे आवश्यक असते. या पिकास जुजबी परंतु नियमित पाणी द्यावे लागते. लसणाच्या पाकळ्या कोरड्यात लावल्यानंतर लगेच त्या दिवशी पाणी द्यावे. आंबवणी साधारणत: ३ ते ४ दिवसांनी दिले पाहिजे. नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात १o ते १२ दिवसांनी पाणी द्यावे.
रोग व्यवस्थापन
तपकिरी करपा : हा बुरशीजन्य रोग असून पानावर पिवळसर रंगाचे लांब चट्टे पडत असतात. चठ्ठयांचा आकार वाढत जाऊन पाने सुकू लागत असतात. पिकांच्या कीटकनाशकासोबत आलटून-पालटून फवारनि करावी.
बाल्यावस्थेत हा रोग झाल्यास झाडांची वाढ खुटते, गडुा लहान राहत असतो. प्रसंगी पूर्ण झाड मरते आणि या रोगाचा प्रादुर्भाव डिसेंबर ते जानेवारी महिन्यात जास्त दिसत असतो.
उपाय : २६ ते ३0 ग्रॅम डायथेन एम-४५ आणि काबॅन्डॅझिम २0-22 ग्रॅम द्रावणात चिकटपणा वाढविणारे स्टिकर जरुर मिसळावे. फवारणी १2 ते १५ दिवसांच्या अंतराने करावी.
जांभळा करपा: या बुरशीजन्य रोगात सुरवातीस खोलगट, लांबट, पांढुरके चट्टे पडलेले असतात. चठ्ठयांचा मधील भाग प्रथम जांभळट व नंतर काळपट होत असतो. असे अनेक पट्टे एकमेकांना लागून असल्यास पाने काळी पडून वाळत असतात. जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात ढगाळ वातावरण राहून आर्द्रता वाढली तर या करप्याचे प्रमाण वाढत असते.
उपाय : या रोगाच्या बंदोबस्तासाठी दर १2 ते १५ दिवसांच्या अंतराने २५ ते ३0 ग्रॅम डायथेन एम-४५, कार्बन्डॅझिम २0 ग्रॅम १0-12 लीटर पाण्यात कीटकनाशकासोबत आलटून पालटून फवारावे
गडुा कूज : साठवणुकीत किंवा शेतात ही बुरशी लसणाच्या गडुयावर वाढते. ही बुरशी पाकळ्यांच्या आत शिरल्याने पाकळ्या मऊ पडतात व त्यावर निळसर पावडर जमा होते.
उपाय : लागवडीसाठी निरोगी बियाणे वापरावे आणि लागवडीनंतर वाफ्यास भरपूर पाणी द्यावे .
काढणी
लसणाचे पीक साधारणपणे १२0 ते १३0 दिवसात काढणीला येते.
1 thought on “लसूण लागवडीचे व्यवस्थापन 2022”