पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे, सर्वत्रच पाऊस कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे, आणि ही चांगली गोष्ट आहे.
शेतकऱ्यांसाठी तसेच पर्यटकांसाठी सुद्धा पाऊस पडल्यानंतर ट्रेकर्स आणि गडकिल्ल्यावर पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असते.
गडकिल्ल्यांचे पर्यटन आणि ट्रेकिंग जरूर करावे पण सध्या पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता जास्त असते आणि चिखलामुळे पाय ही घसरण्याची शक्यता असते, तरी सर्व पर्यटकांनी आणि ट्रेकर्सनी काळजी घेऊन स्वतःच्या जीवाला जपत ट्रेकिंग व गड पर्यटन करावे.
अति स्टंट करण्याच्या भानगडीत पडू नये, कारण आधी स्वतःचा जीव महत्त्वाचा असतो, आपण शाबूत राहू तर अनेक ट्रेकर्स आणि पर्यटन आपल्याला नंतरही करता येतील.
महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे कित्येक जणांचे डोळे लागलेले असतात.
“आपल्यामुळे कित्येकजण जगत असतात आणि कित्येक जणांमुळे आपण जगत असतो” याचाही विचार करावा.
शेतकऱ्यांनी सुद्धा विजेच्या (लाईटच्या) पोल पासून व मोटारीच्या डब्यापासून थोडं जपून राहावं कारण त्यातही करंट उतरण्याची शक्यता असते.. मोटर सायकल (टू व्हीलर) चालवताना सुद्धा त्यावर आपले नियंत्रण ठेवावे कारण ती ही घसरण्याची शक्यता असते.
“आपल्याला अजून कितीतरी पावसाळ्याचा आनंद लुटायचा आहे”.