आजचा हवामान अंदाज ओडिशा आणि लगतच्या परिसरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रासह गुजरात तटपासून कर्नाटक तटापर्यंत होत असलेल्या हवामान बदलामुळे १२- १३ जुलैपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबईतदेखील येत्या २४ तासांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे आणि गेल्या २४ तासांत मुंबईचा जोर ओसरला असला तरीदेखील आपत्कालीन घटनांचे सत्र सुरूच आहे.
रेड अलर्ट
१० जुलै रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे.
११ जुलै पालघर, रत्नागिरी, रायगड, पुणे आणि सातारा रेड देण्यात आला आहे.
ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
१० ते १३ जुलै
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा
गेल्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाट भागात आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची नोंद झालीली आहे. एक – दोन ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे आणि पुढील पाच दिवस हीच स्थिती कायम राहील. ओडिशा आणि आसपासच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. गुजरात तटपासून कर्नाटक तटपर्यंत द्रोणीय क्षेत्र आहे आणि याच्या प्रभावामुळे पुढील पाच दिवस कोकण किनारपट्टीवर, मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात आणि मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.