Kevada medicinal plant : केवडा एक औषधी वनस्पती 2023 - डिजिटल शेतकरी

Kevada medicinal plant : केवडा एक औषधी वनस्पती 2023

केवडा : वनस्पती व फळे

Kevada medicinal plant: केवडा ही पँडॅनेसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव पँडॅनस ओडोरॅटिसिमस असे म्हंटले आहे. या वनस्पतीच्या सुवासिक कणसाला सामान्यपणे केवडा असे म्हणतात. हे कणीस नरफुलांचा फुलोरा असतो आणि  या वनस्पतीचा प्रसार निसर्गत: भारतीय द्वीपकल्पाच्या पूर्व व पश्चिम किनार्‍यांवर, ओरिसा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, पश्चिम बंगाल तसेच म्यानमार, अंदमान बेटे इत्यादी  प्रदेशांत झाला आहे. ती शोभिवंत फुलोर्‍यांसाठी आणि सुगंधासाठी बागेतही लावली जातात.Kevada medicinal plant

केवडा : वनस्पती व फळे

  • केवड्याचे नागमोडी झुडूप सु. ३-४  मी. उंच वाढते. अनेक वायवी (हवेतील) व जाड आधार मुळांनी याचे खोड उभे सावरून वाढलेले असते. फांद्या जाडजूड व पाने टोकाकडे गर्दीने येत असतात. पाने साधी, समुद्रवर्णी हिरव्या रंगाची, १०० -१५० सेंमी. लांब, खड्गाकृती, एकांतरित, टोकदार, वरून गुळगुळीत व खालून फिकट पडत असतात. या चिवट पानांच्या कडा व मध्यशिरा काटेरी पडत  असतात. फुले एकलिंगी असता आणि  नरफुलांची छदकणिशे २८ -५० सेंमी. लांब असून त्यात अनेक बिनदेठाची, दंडाकार, ७ -१० सेंमी. लांब व लहान लहान कणिशे असतात. त्या प्रत्येकावर एक लांब व शेपटीसारखा सुवासिक पांढरा किंवा पिवळा महाछद पडलेला  असतो.
  • मादीफुलाचे छदकणिश एकटे व सु. ५ सेंमी. व्यासाचे असते व त्यापासून पिवळट किंवा लालसर लहान फणसासारखे, बोथट काट्यांचे संयुक्त आणि काष्ठमय फळ बनत असते आणि केवड्याची नवीन लागवड खोडाच्या (जमिनीवरच्या व खालच्या) आडव्या फांद्यांनी करतात.
  • तीन-चार वर्षांनी केवडे येतात आणि  पिकलेल्या कणसाच्या फुलांपासून ऊर्ध्वपातन पद्धतीने (वाफ थंड करून) तेल मिळवित असतात. या तेलातील मुख्य सुगंधी घटक बीटा-फिनिल एथिल अल्कोहॉलाचा मिथिल ईथर असतो आणि  हे सुगंधी तेल चंदनतेलात किंवा द्रव पॅराफिनात मिसळून केवडा अत्तर बनवितात.Kevada medicinal plant
  • केवड्याच्या पानांचा उपयोग झोपड्यांची छपरे, चटया, दोर, मॅनिला हॅट, टोपल्या व पिशव्यांसाठी करत असतात. पाने स्तंभक (आंकुचन करणारी), उग्र व सुवासिक असून अर्बुद, कुष्ठरोग, देवी, उपदंश, खरूज, कोड इत्यादींवर गुणकारी प्रभावी असतात. तेल स्तंभक, उत्तेजक व जंतुनाशक असून डोकेदुखीवर व संधिवातावर उपयुक्त ठरत असते.
  • सामान्यत: नद्या, कालवे, तळी व शेती यांच्या कडेने केवड्याची वने वाढवितात असतात. ती जमिनीतील माती एकत्र धरून ठेवत असल्याने मातीची धूप थांबवून पर्यावरण संधारणास उपकारक ठरत असतात.Kevada medicinal plant

हे हि वाचा : माती परीक्षण कसे कराल

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

1 thought on “Kevada medicinal plant : केवडा एक औषधी वनस्पती 2023”

  1. एक 270 रोपांची बाग माझा मार्गदर्शना खाली लावली ह्या वर्षि .
    मिलिंद काळे
    M.Sc agri
    कृषि मार्गदर्शक
    9158172674

    Reply

Leave a Comment