soil test:माती परीक्षण सर्वसाधारणपणे पिकास कर्ब, हायड्रोेजन, प्रमाणवायु, नत्र, स्फुरद व पालाश या मुख्य अन्नद्रव्यांची, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक या दुय्यम अन्नद्रव्यांची तर लोह, मंगल, जस्त, तांबे, बोरॉन, मॉलिब्डेनम या सुक्ष्म अन्नद्रव्यांची फार आवश्यकता असते. माती परीक्षण यापैकी नत्र, स्फुरद, गंधक, लोह व जस्त यासारख्या अन्नद्रव्यांची कमतरता आढळून आलेली असते.
खतांचा असमतोल वापर यापुढे याचपध्दतीने होत राहिला तर भविष्यात जमिनीचे(soil) आरोग्य बिघडणे आणि सुपिकता कमी होवून पिकांची उत्पादकता घटण्याबरोबरच निकृष्ट दर्जाची जमिन पुढील पिढीस हस्तांतरीत करण्याची नामुष्की आपणावर येण्याचा मोठा धोका निर्माण होत आहे. यासाठी शेतकर्याने स्वत:च्या जमिनीचे माती परिक्षण करुन घेणे आणि त्याच्या तपासणी अहवालानुसार येणार्या शिफारशी प्रमाणे खतांचा वापर करणे व जामिनीचे व्यवस्थापान करणे फार आवश्यक आहे. त्यामुळे पिक उत्पादनांत वाढ होऊन खताच्या वापरावर होणारा अवाजवी खर्च पुढील दिवसात कमी होणार आहे.
माती परिक्षणाचे फायदे:
- जमिनीतील घटकांचे प्रमाण तसेच जमिनीतील दोष आपणास समजतात.
- जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड व नियोजन करता येत असते.
- जमिन सुधारण्यासाठी नियोजनबध्द उपाययोजना करता येत असतात.
- खतांची संतुलीत मात्रा मिळाल्यामुळे पिकांची वाढ चांगली होत असते.
- आवश्यक तेवढेच खत दिल्यामुळे आर्थिक बचत होत असते.
- जमिनीत संतुलीत खतांचा पुरवठा झाल्यामुळे तिची उत्पादन क्षमता टिकून राहण्यास मदत होते.
- माती परिक्षणामुळे जमिनीची सुपिकता आजमवता येते व जामिनीचे प्रकार निश्चित करता येत असतात.
मातीचा नमुना घेताना घ्यावयाची काळजी:
- मातीचा नमुना घेण्यासाठी वापरात येणारी अवजारे उदा. फावडे, कुदळ, घमेले, खुरपी इत्यादी स्वच्छ असावीत.
- मातीचा नमुना पिके काढल्यानंतर परंतू नांगरणी पुर्वी घेण्यात यावा. शक्यतो रब्बी पिकाच्या काढणीनंतर किंवा उन्हाळयात घेतल्यास पृथ:करण करुन परिक्षण अहवाल पेरणीपर्यंत उपलब्ध होत असतो.
- उभ्या पिकांखालील मातीचा नमुना घ्यावयाचा असेल तर दोन ओळीमधील मातीचा नमुना घेतला जावा. परंतु पिकास रासायनिक खत दिले असल्यास तीन महिन्याच्या आत संबधित जमिनीतून माती नमुना हा घेतला जाऊ नये.
- निरनिराळया जमिनीतील नमुना गोळा करताना वेगवेगळया मातीचे नमुने एकत्र मिसळू नका.
- माती नमुना गोळा करताना किंवा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविताना रासायनिक खतांच्या रिकाम्या पिशव्यांचा वापर टाळावा.
- शेतामधील खते साठविण्याची जागा, कचरा टाकण्याची जागा, जनावरे बसण्याची जागा, झाडाखालील जागा, विहिरीजवळ, पाण्याचे पाट व शेताचे बांध इत्यादी जागामधून किंवा जवळून मातीचे नमुने घेतले जाऊ नये.soil test
हे हि वाचा :गट शेती योजना काय आहे आणि फायदे अनुदान 2022
मातीचा नमुना घेण्याची पध्दत:
- मातीचा नमुना हा त्या शेतातील प्रातिनिधीक स्वरुपाचा असणे म्हत्वाचे आहे. एक हेक्टर क्षेत्रातील 15 सेंमी खोलीपर्यंतच्या मातीचे वजन अंदाजे 22,45,000 किलो ग्रॅम असते. यातून काढावा लागणारा 500 ग्रॅम मातीचा नमुना प्रातिनिधीक होण्यासाठी किती काळजीपुर्वक घ्यावा लागेल आणि याची कल्पना येते. कारण यामधून केवळ काही ग्रॅम माती तपासणीसाठी वापरली जाते व तिच्या तपासणीच्या निष्कर्षावर आधारित खताच्या शिफारशी केल्या जात असतात म्हणून मातीचा नमुना काळजीपुर्वक काढला जावा.
- मातीचा नमुना काढण्यासाठी शेतात गेल्याांतर प्रथम शेतीची पाहणी करावी व जमिनीच्या प्रकारानुसार वनस्पती/ पिकांचा रंग, वाढ भिन्न भिन्न असते, तसेच जमिनीच्या पृष्ठभागावरचा रंग देखील वेगवेगळा दिसत असतो. उतारावरील जमीन भुरकट रंगाची असते, सखल भागातील काळी असते म्हणूनच उतार रंग, पोत, खोली, व्यवस्थापन व पिक पध्दतीनुसार विभागणी करावी आणि प्रत्येक विभागातून स्वतंत्र्यरित्या वेगळा प्रातिनिधीक नमुना हा घेतला जावा.
- सपाट पृष्ठभाग असलेल्या जमिनीवर 30×30×30 सेमी आकाराचा चौकोनी खड्डा करुन आतील माती बाहेर काढून टाका. खड्डयाच्या सर्व बाजुची 2 सेमी जाडीची माती खुरप्याच्या सहाय्याने वरपासून खालपर्यंत खरडून हातावर काढा आणि प्लॅस्टीकच्या बादलीत भरून घ्या.आणि अशारितीने एका प्रभागातून 10 नमुने घेऊन त्याच बादलीत टाका.
- सर्व माती एका स्वच्छ प्लॅस्टीकच्या कागदावर टाका, चांगली मिसळा, ओली असल्यास सावलीत वाळवा नंतर हया ढिगाचे चार समान भाग करून घ्या आणि समोरासमोरील दोन भाग काढून टाका. उरलेले दोन भाग एकत्र मिसळा व पुन्हा चार भाग करा आणि हि प्रक्रिया एक किलो ग्रॅम माती शिल्लक राहीपर्यंत करा.
हे हि वाचा :रोपवटिका अनुदान योजना महा डी बी टी 2022
मातीचे नमुना कोठे व कसा पाठवावा:
- मातीचे नमुना घेतल्यानंतर खालील माहिती लिहून ती, मातीचा नमुना असलेल्या पिशवीत टाकावी, मातीचा नमुना लवकरात लवकर जवळच्या माती परिक्षण प्रयोगशाळेकडे पाठविला जावा.soil test
- शेतकर्यांचे पुर्ण नांव,पुर्ण पत्ता,गट नंबर / सर्व्हे नं.,बागायत / कोरडवाहु,ओलीताचे साधन,जमिनीचा निचरा,जमिनीचा प्रकार,जमिनीचा उतार,जमिनीची खोली,नमुना घेतल्याची तारीख,मागील हंगामात घेतलेले पिक व त्याचे उत्पादन, वापरलेली खते व त्यांचे प्रमाण,पुढील हंगामात घ्यावयाची पिके, त्यांची जात व अपेक्षित उत्पादन.
- माती परिक्षण प्रयोगशाळेत मृद नमुना तपासल्यानंतर अहवालाप्रमाणे मातीचा सामू, क्षारता, मुक्त चुन्याचे प्रमाण, उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये, लोह, जस्त, बोरॉन व मँगेनिज इत्यादीचे प्रमाण नमुद केलेले त्यात असते. ह्या माती परिक्षण अहवालावरुन सामू सर्वसाधारणप्रमाणे 6.5 ते 7.5 पर्यंत असावा कारण या दरम्यानच वनस्पतींना लागणारी बहुतेक अन्नद्रव्ये उपलब्ध होत असतात. सामू 6.5 पेक्षा कमी असल्यास त्यांना आम्ल जमिनी असे म्हणतात.
विशेषत: कोकणातील जमिनीचा सामू जास्त आम्लयुक्त हा असतो. अशा जमिनी सुधारण्यासाठी चुन्याचा शेणखतातून वापर करावा लागत असतो . याउलट पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील जमिनीचा सामू किंचीत विम्ल ते अतिशय विम्ल (सामू 7.5 ते 9.0) प्रकारच्या दिसत आहेत. सामू 8.5 पेक्षा जास्त असलेल्या अतिविम्ल चोपण जमिनीमध्ये भूसुधारक म्हणुन जिप्समचा शेणखतातुन वापर करावा लागतो. मात्र चुनखडीयुक्त चोपण जमिनींची सुधारणा करतानां जिप्सम ऐवजी गंधकांचा शेणखतातून वापर करत असतात.
जमिनीचा दुसरा पायाभूत गुणधर्म म्हणजे क्षारता आणि ही क्षारता प्रयोगशाळेत इलेक्ट्रीक कंडक्टीव्हीटी या उपकराणाव्दारे जमिनीतील किंवा पाण्यातील एकुण विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण मोजले जात असते. मातीमधील विद्युत वाहकता (क्षारता) 1.2६ डेसी. सा./मीटर पेक्षा जास्त असेल तर त्यांना क्षारयुक्त जमिनी असे म्हणतात. अशा जमिनीच्या पृष्ठभागावर विरघळलेल्या क्षारांचा पांढरा थर दिसून येत असतो.
त्यामूळे मातीची क्षारता सर्वसाधारणपणे 0.10 ते 0.40 डेसी. सा./मीटर या दरम्यानच असावी त्यापेक्षा जास्त असल्यास जमिनीस निचर्याची व्यवस्था चर खोदून करावी आणि जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करावा, हिरवळीची पिके जमिनीत गाडावीत आणि चांगल्या प्रतीचे पाणी सिंचनास वापरुन अतिरिक्त क्षाराचा निचरा करावा लागतो.
चांगल्या प्रतिच्या पाण्याची क्षारता 0.5 डेसी. सा. / मीटर त्यापेक्षा पेक्षा कमी असते. ही क्षारता 2.5 डेसी. सा. / मीटर पेक्षा जास्त असल्यास असे पाणी सिंचनास अयोग्य समजले जाते आणि पाण्याची क्षारता 3.15 डेसी. सा./मीटर पेक्षा जास्त असल्यास ठिबकसाठी अयोग्य समेाले जाते.
माती परिक्षणावरुन शिफारशीत खत मात्रांचा वापर:
- मातीचे पृथ:करण केल्यानंतर जमिनीमध्ये असलेल्या उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते असते. उदा. उपलब्ध नत्राचे प्रमाण जमिनीमध्ये कमी असल्यास विविध पिकासाठी शिफारस केलेल्या खत मात्रेत 25 टक्कयांनीं वाढ करावी हेच प्रमाण जास्त असल्यास शिफारशीत खत मात्रेत 25 टक्क्यांनी कमी करत असतात.
- मात्र जमिनीमध्ये अन्नद्रव्यांचे प्रमाण मध्यम असल्यास पिकाच्या शिफारशीत खत मात्रा दिलेली आहे ती तशीच द्यावी लागते. अशाप्रकारे खालील दिलेल्या तक्त्यानुसार जमिनीतील अन्नद्रव्यांच्या वर्गीकरणाप्रमाणे विविध पिकांसाठी नत्र, स्फुरद व पालाशच्या शिफारशीत खत मात्रेत बदल करत असतात.
सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर:
- पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा विभागातील जमिनीत प्रामुख्याने जास्त, लोह, बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता तर कोकणातील तांबडया, भात खाचरातील जमिनीमध्ये जस्त व बोरॉनची कमतरता आढळून येत असते.
- सूक्ष्म अन्नद्रव्यांसाठी माती परिक्षण केल्यास जर जमिनीत 4.5 पीपीएम पेक्षा लोहाचे प्रमाण कमी असल्यास कमतरता समजावी, 0.6 पीपीएम पेक्षा जस्ताचे प्रमाण कमी असल्यास कमतरता समजावी आणि तर बोरॉनसाठी जमिनीमध्ये 0.5 पीपीएम पेक्षा प्रमाण कमी असल्यास कमतरता समजावी. अशा प्रकारची जस्त, लोह आणि बोरॉनची कमतरता जमिनीत असल्यास अनुक्रमे झिंक सल्फेट 20 किलो, फेरस सल्फेट (हिराकस) 25 किलो/हे आणि 5 किलो/हे बोरॅक्स जमिनीतून दिली पाहिजे.
विशेषत: लोह, जस्त ही रासायनिक खताव्दारे देताना शेणखतात मिसळून, मुरवून दिल्यास सूक्ष्म अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढते व पिकानां लवकर उपलब्ध होत असते. फवारणीव्दारे सूक्ष्म अन्नद्रव्ये देताना लोह व जस्तासाठी 0.2 टक्के (20 ग्रॅम प्रति 10-१२ लिटर पाण्यात) चिलेटेड स्वरुपातील खते वापरावीत तर बोरॉनसाठी बोरीक अॅसीडचा 0.1-०.२ टक्के (10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) वापर करत असतात.
शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा
2 thoughts on “soil test: माती परीक्षण कसे कराल 2023”