Land Dispute: एका गावात मानसिंग नावाचा एक शेतकरी राहत होता आणि आर्थिक अडचणीमुळे मानसिंगने आपला जमिनीचा प्लॉट विकायचे ठरविले होते. मानसिंगने जमिनीचा व्यवहार केला व खरेदीखतही केले होते. पण खरेदी खत करताना एकच प्लॉट रामेश्वर व गोविंदा या दोघांना विकला व खरेदीखतसुद्धा या दोघांच्या नावाने केले होती. काही दिवसांनंतर हे प्रकरण लक्षात आल्यानंतर रामेश्वर व गोविंदा या दोन खरेदीदार Land Dispute व्यक्तींमध्ये जोरदार वाद झाला होता.
दोघांचा पण दावा होता, की हा प्लॉट मी खरेदीखताने रोख पैसे मोजून घेतला आहे आणि दोघांनी एकमेकांना खरेदीखत दाखवायला सांगितले होते. पण रामेश्वर व गोविंदा हे दोघेही आपल्याच मुद्यावर अडून होते, की मी रजिस्टर खरेदीखत केले आहे तसेच तुझेच खरेदीखत खोटे असणार, तू कोर्टात जाऊन सिद्ध करून आण. त्यांचा हा वाद जवळपास एक महिना चालला, पण त्यात काहीही निर्णय झाला नव्हता.(Land Dispute)
शेवटी रामेश्वर व गोविंदाचे भांडण कोर्टात गेले आणि दोघांनी पण त्यांचे स्वतंत्र वकील लावले.( land record)
कोर्टाने दोघांच्याही वकिलांना रामेश्वर व गोविंदाच्या खरेदीखताच्या मूळ प्रति दाखल करण्यास सांगितले आणि दोन्ही खरेदीखते रजिस्टर होती. परंतु खरेदीखतांच्या तारखा मात्र वेगवेगळ्या होत्या तसेच शेवटी कोर्टाने कायद्यानुसार अगोदरच्या तारखेचे खरेदीखत ग्राह्य धरले. त्यात रामेश्वरचे खरेदीखत हे अगोदरच्या तारखेचे होते व गोविंदाचे खरेदीखत हे नंतरच्या तारखेचे होते आणि त्यामुळे गोविंदाला मनस्ताप झाला व त्यात त्याचे प्रचंड नुकसान पण झाले होते.Land Dispute
सांगावयाचे तात्पर्य म्हणजे परीक्षेची वेळ आली, की सत्य काय ते बाहेर येत असते. कायद्यानुसार पहिले खरेदीखत कायदेशीर असल्यामुळे दुसऱ्यांदा जमीन विकण्याचा मूळ मालकाला हक्क उरत नसतो.
जमीन खरेदी करण्यापूर्वी…
एका गावात देविदास नावाचा एक शेतकरी राहत होता. देविदासला त्याची जमीन विकायची होती तसेच गावातील एक महादेव नावाचा शेतकरी व देविदास यांची भेट झाली होती. देविदासने महादेवला जमीन घेणार का, असे विचारले, तेव्हा महादेव जमीन घ्यायला लगेच तयार झाला आणि जमीन विक्री करताना देविदासने जमिनीमध्ये विहीरसुद्धा असल्याचे सांगितले होते. जमीन विक्री करताना देविदासने अतिशय गोड बोलून व घाईघाईने रोख पैसे घेऊन खरेदीखत महादेवच्या नावावर करून दिले होते. देविदासचे जवळचे नातेवाईक आजारी असल्याचे कारण सांगून खरेदीखत झाल्यावर दुसऱ्या दिवशी शहरात राहायला निघून गेला होता. खरेदीखताप्रमाणे दोन महिन्यांनी महादेवचे नाव सातबारा उताऱ्यास लागले होते.Land Dispute
पिकांचा पहिला हंगाम संपल्यानंतर महादेवने जमीन मोजणी कार्यालयाकडून शासकीय मोजणी करून घेतली होती. मोजणीमध्ये ती जमीन पंधरा गुंठे कमी भरली आणि तसेच जी विहीर खरेदी घेतलेल्या जमिनीत असल्याचे सांगितले होते, ती सुद्धा सामायिकात व बांधावर असल्याचे लक्षात आले होते. ( land record) त्यामुळे बांधापलीकडचे शेतकरी आता खरेदी घेणाऱ्या बरोबर, म्हणजे महादेव सोबत दररोज भांडण करू लागले होते. याचा पश्चात्ताप महादेवला फार झाला, पण त्यात महादेवची चूक होती हे त्याच्या लक्षात आले आणि देविदासने आपल्याला घाईमध्ये जमिनीचा व्यवहार करून फसवले हे त्याच्या लक्षात आले होते. आपण इतक्या घाईमध्ये या जमिनीचा व्यवहार करायला नको होता परंतु वेळ निघून गेल्यावर महादेवला काहीही करता येत नव्हते.( land record)
सांगावयाचे तात्पर्य म्हणजे जमीन खरेदी करण्यापूर्वी जमिनीचा प्रत्यक्ष ताबा किती क्षेत्रावर आहे हे पाहणे हिताचे! बांधावरची विहीर किंवा झाडे यामध्ये शेजारचे शेतकरीसुद्धा हिस्सेदार आहेत का, हे निश्चितपणे तपासणे फार गरजेचे असते Land Dispute.