Land Information: भोगावटा १ आणि भोगवाटा २ मधील फरक 7/12 च्या अर्कवर हे माहित आहे का - डिजिटल शेतकरी

Land Information: भोगावटा १ आणि भोगवाटा २ मधील फरक 7/12 च्या अर्कवर हे माहित आहे का

Land Information भोगावटा 1: –

जो खातेदार फार पूर्वी पासून जमिनीचा (Land Information) कब्जेदार असून त्याला सदर जमिन विकण्याचा पूर्ण अधिकार बहाल केला जात असतो. अशा जमीनींचा खातेदाराचा वर्ग 1 मध्ये समावेश होतो आणि या जमिनी विक्री / हस्तांतरण कामी कोणत्याही शासकीय पूर्वपरवानगीची गरज नसते. तसेच थोडक्‍यात, मुळ मालकीची वडलोपार आलेली जमीन भोगवटादार वर्ग 1 मध्ये असते.

Land Information भोगावटा 2: –

ज्या जमिनी खातेदाराला विकण्याचा अधिकार बहाल केला जात नाही. असा खातेदार म्हणजेच भोगवटादार वर्ग 2 होय. उदा. देवस्थान इमानी जमीन,हैद्राबाद अतियात जमिनी, वतन जमीन, वन जमीन, गायरान, पुन पुनर्वसनाच्या जमीनी व शासनाने दिलेल्या जमिनींचा समावेश होत असतो. अशा जमीनी विक्री साठी शासनाची (Land Information)पूर्व परवानगी घेणे फार आवश्यक असते.

जमीन घेताना खालील बाबी काटेकोरपणे पालन करावे :-

  1. जमीनीचा उतारा पाहून त्यावरील भूधारना पद्धतीत कोणता शेरा आहे हे पहणे गरजेचे असते. जर त्यात भोगवटादार वर्ग 2 किंवा न.अ.श असा शेरा आला की सदर जमीन ही शासनाच्या पूर्व परवानगीनेच खरेदी करावी लागेल हे नी निश्चित करावे लागते.
  2. जमीन भोगवटादार वर्ग 2 ची आहे परंतू ती कोणत्या प्रकारात आहे हे पहाणे आवश्क असते. उदा. सिलिंग जमीन, प्रकल्पग्रस्ताची जमीन, सैनीकाची जमीन, आदिवासी जमीन, कुळ जमीन इ. हे पहाण्यासाठी 7/12 वरील इतरहक्क मालकी हक्क नावे पहाणे आवश्क असते.
  3. जर 7/12 वरून जमीन वर्ग-2 ची आहे परंतू ती कोणत्या प्रकारची आहे हे कळत नसेल तर तलाठी कार्यालय, तहसील कार्यालयातून सदर जमीनीचा प्रवर्ग कोणता आहे हे तपासणे आवश्क.
  4. देवस्थान महसूल माफीची जमीन, वन जमीन, गायरान जमीन या जमिनीची खरेदी विक्री व्यवहार होत नाहीत आणि अशा जमिनींच्या बाबत कोणताही व्यवहार करू नये.
  5. ज्या खातेदारची आपण घेणार आहोत त्या खातेदाराच्या सर्व वरसांचे नाहरकत व परवानगी किंवा इतर नोंदणीकृत दस्ताने परवानगी घेणे फार आवश्यक आहे.
  6. भोगवटादार वर्ग 2 चा खातेदार भूमिहीन होणार नाही अशा पद्धतीने जमीन खरेदी करणे केव्हाही चांगले असते. कारण जर तो भूमिहीन झाला तर कालंतराने वाद उभा राहू शकत आहे.
  7. भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनीची खरेदी व आदिवासी खातेदाराची जमिनी खरेदी याबाबत कायदे वेगवेगळे आहेत आणि आदिवासी खातेदाराची जमीन खरेदी (Land Information)करण्यासाठी शासनस्तरावरून मंजूरी लागत असते.
  8. आदिवासी खातेदाराची जमनी स्वतात मिळते म्हणून शासनाचा पूर्व परवानगी शिवाय कोणत्याही मार्गाने ती घेण्याचा प्रयत्न करू नका.

भोगवटादार वर्ग 2 चे वर्ग 1 मध्ये रूपांतर :-

प्रारंभाच्या दिनांकास किंवा भोगवटादारास नवीन व अविभाज्य शर्तीवर/ भोगवटादार वर्ग 2 धारण केलेला असा कोणताही भोगवटा, अशा जमिनीच्या चालू बाजाराच्या पन्नास टक्के इतकी रक्कम यनजराणा म्हणून शासनाला प्रधान करून भोगवटादार वर्ग एक मध्ये रूपांतर करता येत असते(Land Information) आणि अशा रूपांतरानंतर भोगवटादार , महारास्ट्र जमीन महसूल सहिता 1966 याच्या तरतुदी अशी जमीन भोगवटादार वर्ग 1 म्हणून धारण करील.

land record

हे हि वाचा : शेतीचा बांध कोरल्यावर होणार फौजदारी गुन्हा दाखल

डिजिटल शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा👇

Leave a Comment