राज्यात लम्पी स्कीन (Lumpy skin disease) आजाराचा प्रसार रोखण्यासाठी जनावरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत अशी माहिती राज्याचे पशुसंवर्धन व महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी ही माहिती दिली आहे.(Lumpy skin disease) आंतरराज्यीय, आंतर जिल्हा, आंतर तालुकास्तरावर जनावरांची ने आण बंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले जात आहे.
सद्यस्थितीत राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीन(Lumpy skin disease) आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे आणि राज्यात लम्पी आजाराने ३२ तर जळगाव जिल्ह्यात १२ जनावरांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती विखे पाटील यांनी दिली आहे. जळगाव जिल्ह्यात त्यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली आहे. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून न राहता थेट शेतकऱ्यांच्या दारात जावे आणि औषधोपचार व इतर मदत करावी, अशी कानउघडणी त्यांनी यावेळी केली आहे.
राज्यात लम्पी स्कीनया आजाराचा शिरकाव हा गुजरात आणि राजस्थान या राज्यातून झाला आहे आणि या आजारात मृत्यूचे प्रमाण अत्यल्प असले तरी लसीकरण करण्यास प्राधान्य दिले जात आहे, असे विखे पाटील म्हणाले आहे.
जनावरांमध्ये लम्पी स्कीन डीसीजची (Lumpy skin diseases) लक्षणे आढळून येताच जनावरांना शासकीय पशुचिकित्सालयात (Government Veterinary Hospital) आणावे आणि जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) माध्यमातून पशु चिकित्सालयात आवश्यक पशु औषधे उपलब्ध करून देण्यात येतील, असे विखे पाटील यांनी सांगितले आहे.
हे हि वाचा : disease:लाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रण 2022
2 thoughts on “Lumpy Skin: लम्पी स्कीन रोखण्यासाठी जनावरांचे बाजार बंदः विखे पाटील 2022”