अमरावती : बापरे जनावरांमधील ‘लम्पी स्कीन’ आजाराच्या (Lumpy Skin Disease) नियंत्रणासाठी द्यावयाच्या लसीऐवजी (Lumpy skin vaccine) एका पशुवैद्यकाने तब्बल १५० जनावरांना भलतीच लस टोचल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पडा यांनी या पशुवैद्यकाला तडकाफडकी निलंबित (Veterinarian Suspended) करण्यात आले असून, निलंबन काळात त्याचा सेवा कालावधी चिखलदरा येथे राहणार आहे.
चांदूरबाजार पंचायत समितीअंतर्गत असलेल्या आसेगाव पूर्णा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात सदाशिव रंगराव सातव हे पशुधन विकास अधिकारी म्हणून सध्या ते कार्यरत आहेत. या दवाखान्याच्या हद्दीतील टाकरखेडापूर्णा या गावात ‘लम्पी(Lumpy Skin )’ या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने व काही जनावरांना त्याची लागण झाल्याने लसीकरण करण्याची सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सदाशिव सातव यांनी गावात जात जवळपास १५० गाय, बैल, म्हैस यांना लस दिली होती.
हे हि वाचा : सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव
मात्र गोट पॉक्स ही लस देण्याऐवजी त्यांनी ब्रुसेला अबॉर्स ही भलतीच लस दिल्याचे धक्कादायक बातमी समोर आले आहे . ब्रुसेला अबॉर्स ही लस आठ ते नऊ महिन्यांच्या कालवडींना देण्यात येत असते. भविष्यात त्यांचा गर्भपात होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक स्वरूपात ही लस देण्याचे नियोजन असते. मात्र सदाशिव सातव यांनी कोणतीही खातरजामा न करता लम्पी(Lumpy Skin ) नियंत्रणाच्या नावाखाली बैलासहित सर्वच जनावरांना हीच लस टोचल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे ही लस टोचण्यापूर्वी ती शीतपेटीत आणावी लागत असते. परंतु तसे न करता या लसीचा बॉक्स सदाशिव सातव यांनी थेट गाडीच्या डिक्कीत आणला होता, असेही पशुपालक सांगत आहात. या प्रकाराचा खुलासा झाल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी तक्रार झाल्यानंतर त्याची दखल घेत चौकशी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निमित्ताने पंचनामा करण्यात आला आहे. त्या वेळी पशुवैद्यक(Lumpy Skin ) सदाशिव सातव यांनी चुकीने ही लस देल्याचे मान्य केले आहे. ११० ते १५० जनावरांना ही लस दिल्याचे त्यांनी चौकशी समितीसमोर कबूल केले आहे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी ही बाब गंभीरतेने घेत सदाशिव सातव यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश दिले आहे तसेच निलंबन काळात त्यांचे चिखलदरा मुख्यालय राहील.