Soybean : सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव - डिजिटल शेतकरी

Soybean : सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव

हिंगोली ः हिंगोली, परभणी तसेच इतर राज्यातील  जिल्ह्यातील सोयाबीन (Soybean) पिकांवर पाने खाणाऱ्या विविध प्रकारच्या अळ्यांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या किडींच्या नियंत्रणासाठी (Pest Control Soybean) एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा (Integrated Pest Management Method) अवलंब करावा, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञांनी केले जात आहे.

soybean crop

सोयाबीनचे(Soybean) पीक सध्या फुलोरा, शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे आणि हिंगोली, परभणी जिल्ह्यांतील अनेक भागातील सोयाबीनवर(Soybean) पाने खाणारी लष्करी अळी, उंट अळी, केसाळ अळी आदींचा प्रादुर्भाव आढळून आला  आहे. अनेक भागात चक्री भुंगा तसेच कोवळ्या शेंगावर घाटे अळीचा प्रादुर्भाव देखील आढळून आले आहे.

या किडींच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी पिकांमध्ये पक्षी थांबे लावावे आणि  लष्करी अळी तसेच घाटे अळीच्या पतंगासाठी कामगंध सापळे लावण्यात यावे. आर्थिक नुकसान पातळी ओळखून तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार शिफारशीत कीटकनाशकांची फवारणी करावी, असे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. डी. डी. पटाईत यांनी सांगितले जात आहे.

हे हि वाचा : अमेरिकेचा दुष्काळ भारतीय कापूस उत्पादकांच्या पथ्थ्यावर, पांढऱ्या सोन्याला झळाळी त्यामुळे कापसाला राहणार यंदा चागला भाव

 

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

1 thought on “Soybean : सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव”

Leave a Comment