Milk Rate: जागतिक दूग्ध व्यवसाची उलाढाल सर्वाधिक जगातील बलाढ्य कंपन्यांपेक्षाही दुधाची बाजारपेठ मोठी 2022 - डिजिटल शेतकरी

Milk Rate: जागतिक दूग्ध व्यवसाची उलाढाल सर्वाधिक जगातील बलाढ्य कंपन्यांपेक्षाही दुधाची बाजारपेठ मोठी 2022

पुणे ः जगात जो(  Milk )दुग्धव्यवसाय (Dairy Business) केला जातो तो कदाचित मानवजातीच्या सभ्यतेइतकाच जुना असल्याचं मत जागतिक तज्ञांनी मत व्यक्त केलंय. तसेच आज अॅपल किंवा मग मायक्रोसॉफ्ट या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांची जेवढी उलाढाल आहे, त्याहीपेक्षा जास्त उलाढाल दुग्ध (  Milk )व्यवसायात होत असल्याचं या तज्ञांनी म्हटलंय जात आहे.

ग्रेटर नोएडा मध्ये वर्ल्ड डेअरी समिट (Dairy summit) २०२२ पार पडली आहे. या समिटसाठी जगभरातून दुग्ध व्यवसायातील (Dairy Business) मान्यवर मंडळी उपस्थित होती. आयएफसीएन एजी जर्मनीचे सीईओ डॉ. टॉरस्टेन हेम यावेळी म्हणाले की, डेअरी उद्योगाचे ग्राहक मूल्य (Consumer Value) ८०० अब्ज डॉलर्सच्या घरात असते आणि दुग्ध व्यवसायातील ही उलाढाल अॅपल किंवा मायक्रोसॉफ्ट या तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांच्या एकत्रित कमाईपेक्षाही मोठी आहे.

Mineral

डाॅ. हेम आपल्या सादरीकरणात पुढे म्हणाले की, २०१४ ते २०१९ या कालावधीत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या एकूण कमाईत 70% पेक्षा जास्त वाटा हा दुधातून(  Milk ) मिळणाऱ्या कमाईचा होत असतो. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाचे अध्यक्ष मीनेश शाह यांच्या मते, विकसित आणि विकसनशील अशा दोन्ही देशांमध्ये दुग्धव्यवसाय खूप महत्त्वाचा  भाग आहे. कारण जगभरातील एक अब्जाहून अधिक लोक यावर अवलंबून असतात.

भारताच्या दुग्ध व्यवसायासंबंधात शाह यापूर्वी म्हटले होते की, सध्या भारताचा दुग्धव्यवसाय 13 ट्रिलियन इतका आहे आणि 2027 पर्यंत यात वाढ होऊन तो 30 ट्रिलियन इतका होईल. यावेळी पद्दुचेरी येथील तज्ज्ञ आणि प्राध्यापक डॉ. एस. राजकुमार यांनी दुग्धव्यवसायातील (  Milk )महिलांचे योगदान अधोरेखित केले ते म्हणाले की, “गाई आणि म्हशींपासून दूध उत्पादकता वाढवण्यात महिलांचा सहभाग ही काळाची गरज आहे.”

हे हि वाचा : शेती जमिनीचा नकाशा आपल्या मोबाईल वर ऑनलाईन कसा पाहायचा? फक्त गट नबर टाका आणि आपला नकाशा मोफत पहा

तुम्हाला हि डिजिटल शेतकरी ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा या ग्रुप वर फक्त शेती विषयक चर्चा करता येतील वारसा शेतकरी जोडण्याचा

1 thought on “Milk Rate: जागतिक दूग्ध व्यवसाची उलाढाल सर्वाधिक जगातील बलाढ्य कंपन्यांपेक्षाही दुधाची बाजारपेठ मोठी 2022”

Leave a Comment