आजपासून राज्यात मान्सून जोर धरणार - डिजिटल शेतकरी

आजपासून राज्यात मान्सून जोर धरणार

आजपासून राज्यात ‘जोर’धारा

मुंबई : मान्सूनची आगेकूच सुरू असून, महाराष्ट्रातून पुढे सरकलेला मान्सून आता झारखंड आणि बिहारच्या काही भागांत दाखल झाला आहे असे हवामन खात्यांनी सांगितले. मान्सून पुढील दोन ते तीन दिवसात तो मध्य प्रदेशच्या आणखी भागासह लगतच्या परिसरात दाखल होण्यासाठीचे हवामान अनुकूल असतानाच, मान्सून आता मध्य महाराष्ट्र, विदर्भ, दक्षिण व उत्तर कोकणात पावसाचा जोर वाढणार दिसत  आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात काही ठिकाणी, तर विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली.

 

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, दक्षिण कोकणात सोमवारपासून अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविली  आहे.

– कृष्णानंद होसाळीकर,

अतिरिक्त महासंचालक,

भारतीय हवामान शास्त्र विभाग

Leave a Comment