Urea Fertilizer: शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी, युरीया खताबाबत मोदी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय.. 2022 - डिजिटल शेतकरी

Urea Fertilizer: शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी, युरीया खताबाबत मोदी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय.. 2022

Urea Fertilizer: देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे काय आहे ते पाहूया केंद्र सरकारने युरिया खताबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होईलच, आणि शिवाय सरकारवरीलही अनुदानाचा भार कमी होणार आहे.

Farmers

नॅनो युरियाची विक्री वाढवा

मोदी सरकारने खत कंपन्यांना नॅनो युरियाची विक्री वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत तसे पत्र खत कंपन्यांच्या सीईओंना पाठवले गेले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे दोन पैसे वाचतील, तसेच खताबाबत भारत स्वयंपूर्ण होईल, असा सरकारचा मोठा दावा आहे.Urea Fertilizer

नॅनो युरियावर केंद्र सरकारला कोणतेही अनुदान द्यावे लागत नाही तसेच शेतकऱ्यांनी नॅनो युरियाचा वापर सुरु केल्यास सरकारवरील अनुदानाचा भार कमी होईल. त्यामुळे खत कंपन्यांनी नॅनो युरियाची विक्री वाढवण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन सरकारने केले जात आहे.

युरियाच्या गोणीची किंमत सरकारी अनुदानासह 266 रुपये आहे मात्र, नॅनो युरियामुळे शेतकऱ्यांचे प्रत्येक गोणीमागे 41 रुपये वाचणार आहेत. नॅनो युरियाची अर्ध्या बाटलीची किंमत साधारण 225 रुपये असू शकते, असे सांगण्यात आले आहे.

हे हि वाचा : इलेक्ट्रिक ट्रॅक्टर पहा काय आहेत फायदे 80 रुपये खर्चून 6 तास चालेल

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

1 thought on “Urea Fertilizer: शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी, युरीया खताबाबत मोदी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय.. 2022”

Leave a Comment