Onion construction: शास्त्रोक्त पद्धतीच्या कांदाचाळीची उभारणी करून कांदासाठवण केल्यास साठवणगृहातील तापमान व आर्द्रता यांचा समतोल राहून कोंब येणे, कांदा सडणे, वजनात घट येणे, श्वसन दर, कांदासडीचा प्रादुर्भाव आणि साठविलेल्या कांद्याचा दर्जा नियंत्रित राहण्यास मदत होत असते. कांदाचाळीसाठी जागेची निवड करताना शक्यतो उंच जागेची निवड आवश्य करावी. पाणथळ किंवा उसाच्या शेताजवळ जेथे अति आर्द्रता असते, अशा जागेची निवड करूच नका. जमिनीच्या प्रकारानुसार आवश्यक तेवढा पाया खोदून आराखड्यानुसारOnion construction पायासाठी सिमेंट कॉंक्रीटचे पिलर/ कॉलम उभा करण्यात यावे. तळाशी एक फूट माती काढून त्यामध्ये वाळू,दगड भरावी नंतरच कांदाचाळीची उभारणी करावी. कांदासाठवणुकीची जागा दोन ते अडीच फूट उंच असावी. त्यामुळे खालच्या मोकळ्या जागेतून रात्री थंड हवा चाळीत शिरेल व गरम झालेली हवा चाळीच्या त्रिकोणी भागातून बाहेर पडत असते. अशा रीतीने उत्तम हवा खेळती राहील.
पाया/ आरसीसी खांब/ पिलर/ कॉलम, वरती लोखंडी अँगल किंवा लाकडी खांबाद्वारा चाळीचा संपूर्ण सांगाडा तयार करून घावा.
एक पाखी कांदाचाळीची उभारणी दक्षिण-उत्तर, तर दुपाखी कांदाचाळीची उभारणी पूर्व-पश्चिम हि करण्यात यावी.
चाळीच्या छतासाठी सिमेंट पत्रे अथवा मंगळुरी कौलांचा वापर हा करण्यात यावा त्यापेक्षा उसाचे पाचट असते तर अति उत्तम. बाजूच्या भिंती व तळ यासाठी बांबू किंवा लाकडी पट्ट्यांचा वापर करण्यात यावा. टीन पत्र्याचा वापर केलेला असल्यास आतील बाजूस पांढरा रंग देण्यात यावा. उन्हाळ्यात चाळीचे छप्पर शक्यतो उसाच्या पाचटाने किंवा ज्वारीचा कडबा किंवा गवताने आच्छादन करावे. यामुळे चाळीच्या आतील उष्णता वाढणार नाही हवा थंड राहील. तसेच चाळीत थंड वातावरणनिर्मिती तयार होईल.Onion construction
हे हि वाचा : कोणी तुमचा बांध कोरत तर नाही न
चाळीचे छप्पर उतरते जाड असावे. ते उभ्या भिंतीच्या एक ते दीड मीटर बाहेर असावे. त्यामुळे पावसाचे आरुंडे कांद्यापर्यंत पोचणार नाहीत व कांदे जास्त आर्द्रतेने खराब-सडणार नाही.
कांद्याचा सूर्यप्रकाशाशी प्रत्यक्ष संबंध येऊ देऊ नका. असे झाल्यास पाण्याचे उत्सर्जन व कांद्याचा रंग उतरत असतो. त्यामुळे कांद्याचा दर्जा प्रत कमी होतो. यासाठी कांदा साठवणगृहास शेडनेटचा वापर हितकारक ठरत असतो.
कांदा चाळ करताना 25 मे. टन क्षमतेच्या दुपाखी कांदाचाळीचे बांधकाम करताना लांबी 12 मीटर, एकूण रुंदी 3.9 मीटर, दोन ओळींतील मोकळी जागा 1.5 मीटर (पहिला कप्पा 1.2 मीटर + मधली मोकळी जागा 1.5 मीटर + दुसरा कप्पा 1.2 मीटर), बाजूची उंची 2.4 मीटर व मधली उंची 3.4 मीटर अशा रीतीने मोजमापे घ्यावीत. चाळीच्या एका कप्प्याची आतील रुंदी ही 1.2 मीटर असावी तुम्ही कांदा साठवणुकीसाठी अंतर हे तुमचा कांदा सामतेनुसार करू शकता.Onion construction
कांद्याची साठवणूक ही जास्तीत जास्त पाच फूट उंचीपर्यंत करावी त्यापेक्षा जास्त नको.
2 thoughts on “Onion construction:कांदाचाळ बांधणी”