मोदी सरकारचा मोठा निर्णय शेतकर्यासाठी कर्ज केले स्वस्थ
Pm Modi, Farmers in India: मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदी सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकार शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने काम करत आहे आणि त्यानुसार बैठकीत ३ लाख लाख रूपयांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या कृषी कर्जावर दीड टक्के सवलत मंजूर करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते आणि या योजने अंतर्गत २०२२-२३ ते २०२४-२५ या कालावधीत ३४ हजार ८५६ कोटी रुपयांची अतिरिक्त अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असल्याचेही त्याने सांगितले जात आहे.
हे हि वाचा : सरकारी नोकरी बंपर भरती पोस्टात तब्बल 1 लाख पदांसाठी मेगाभरती..
अनुराग ठाकूर याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की, शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात पुरेशी कर्जे मिळू शकणार आहेत आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासोबतच क्रेडिट लाइन हमी योजनेच्या निधीतही वाढ करण्यास सरकारने मान्यता दिली जात आहे. सरकारच्या या पाऊलामुळे कृषी क्षेत्राला चालना चागली मिळणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी यापूर्वीच सांगितले होते की, सरकार कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देत आहे आणि त्यामुळे खेड्यापाड्यातील सुशिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे. त्या दृष्टीने आज निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) व्याख्यानांच्या मालिकेच्या समारोप कार्यक्रमात तोमर म्हणाले होते की, यामुळे केवळ रोजगाराच्या संधीच निर्माण होणार नाहीत तर शेतकर्यांनाही फायदा होईल आणि शाश्वत उपाय शोधून शेतकर्यांना समृद्ध करता येईल आणि शेतीचे आधुनिकीकरण करता येणार आहे. केंद्राने कृषी क्षेत्राला पूर्ण पाठिंबा देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या असून राज्य सरकारांच्या सहकार्याने हे काम प्रगतीपथावर आहे, असेही ते म्हणाले आहे.
तुम्हाला हि आमच्या ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा या ग्रुप वर फक्त शेती विषयक चर्चा करता येतील.
1 thought on “Pm Modi, Farmers in India: मोदी सरकारचा मोठा निर्णय शेतकर्यासाठी कर्ज केले स्वस्थ 2022”