Rabi Jowar : रब्बी ज्वारीच्या भरघोस उत्पादनासाठी कोणते वाण निवडाल 2022 - डिजिटल शेतकरी

Rabi Jowar : रब्बी ज्वारीच्या भरघोस उत्पादनासाठी कोणते वाण निवडाल 2022

महाराष्ट्रात पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या ठिकाणी रब्बी ज्वारीचे (Rabi Jowar) पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात असते. पश्‍चिम महाराष्ट्रात खरीप ज्वारीची (Kharif Jowar) लागवड होत नाही तसेच या उलट मराठवाड्यात (Marathwada) दोन्ही हंगामांत ज्वारीचे पीक घेतले जात असते. लवकर पेरणी केल्यास खोडमाशीचा (Stemfly) उपद्रव वाढतो तर उशिरा पेरणी केल्यास जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे बियाणांची उगवण कमी होऊन ताटांची योग्य संख्या राखता येत नसते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने रब्बी ज्वारीची पेरणी करताना  कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात याविषय़ी दिलेली माहिती आपण पाहुया.

रब्बी ज्वारीची पेरणी मोठ्या प्रमाणात जिरायती क्षेत्रावर केली जात असते.  मध्यम ते भारी ( Rabi Jowar ) जमिनीत ओल जास्त काळ टिकून राहत असल्याने अशा जमिनीत रब्बी ज्वारीची पेरणी करावी आणि जिरायती क्षेत्रावर जास्त उत्पादन येण्यासाठी योग्य वाणाची निवड जमिनीच्या खोलीनुसार करावी लागत असते. १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर हा काळ रब्बी ज्वारीची कोरडवाहू क्षेत्रामध्ये पेरणी करण्यासाठी शिफारस केलेला असते.

हे हि वाचा : ज्वारी पिकावरील कीड नियंत्रण शेतकऱ्यांना शक्य

जमिनीच्या प्रकारानूसार वाणांची निवड महत्वाची

जमिनीच्या प्रकारानुसार सुधारित संकरित वाणाचा वापर करावा आणि हलक्या जमिनीसाठी फुले अनुराधा, फुले माऊली या वाणांची ( Rabi Jowar ) निवड करण्यात यावी.

मध्यम जमिनीसाठी फुले सुचित्रा, फुले माऊली, फुले चित्रा, परभणी मोती आणि मालदांडी-३५-१ या वाणांची निवड करण्यात यावी.

भारी जमिनीसाठी फुले वसुधा, फुले यशोदा, सीएसव्ही २२,  परभणी मोती आणि सीएसएच १५ या संकरित वाणांची निवड करण्यात यावी.

बागायती जमिनीसाठी फुले रेवती, फुले वसुधा, सी एस व्ही १८, सी एस एच १५ व १९ या वाणांची निवड ( Rabi Jowar ) करण्यात यावी.

तुम्हाला हि डिजिटल शेतकरी ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा या ग्रुप वर फक्त शेती विषयक चर्चा करता येतील वारसा शेतकरी जोडण्याचा

 

1 thought on “Rabi Jowar : रब्बी ज्वारीच्या भरघोस उत्पादनासाठी कोणते वाण निवडाल 2022”

Leave a Comment