Rain Forecast : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात ढगाळ हवामान झाले आहे आणि तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. आज (ता. १७) कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा आहे तसेच तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.(Rain Forecast)
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा जैसलमेर, कोटा, कमी दाब क्षेत्राचे केंद्र, जमशेदपूर, दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे आणि नैर्ऋत्य राजस्थानपासून उत्तर ओडिशा पर्यंत सक्रिय आहे आणि उत्तर अंदमान समुद्रात समुद्रसपाटीपासून ५.८ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.
राज्यात ढगाळ हवामान झाले असून, शनिवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे तसेच आज (ता. १७) उत्तर कोकणातील ठाणे, पालघर जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.
उर्वरित कोकणासह नंदूरबार, नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) आहे आणि उर्वरित राज्यात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
ठळक कमी दाब क्षेत्र कायम(Rain Forecast)
बंगालच्या उपसागरात तयार झालेले ठळक कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आल्यानंतर पश्चिमेकडे सरकत आहे तसेच शनिवारी (ता. १६) ही प्रणाली पूर्व मध्य प्रदेश आणि परिसरावर सक्रिय होती. त्याला लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे आणि ही प्रणाली पुढील दोन दिवसांत गुजरात, राजस्थानकडे सरकण्याचे संकेत आहेत.
जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :
पालघर, ठाणे.
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, नाशिक, पुणे, सातारा.
हे हि वाचा : तुमच्या गावात ग्रामपंचायतीच्या कोणत्या योजना सुरू आहे असे पाहा मोबाईलवर ऑनलाईन