पुणे : Weather Update कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात विजांसह पाऊस (Rain With Lightning In Marathada) सुरू झाला आहे. तर विदर्भात पावसाने उघडीप दिली आहे तसेच आज (ता. ३) कोकण, मध्य महाराष्ट्रात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता (Rain Forecast) वर्तविली आहे.
उर्वरित राज्यात आकाश ढगाळ (Cloudy Weather) राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे. मॉन्सूनची जम्मू, उना, चंडीगड, कर्नाल, बागपथ, दिल्ली, अलवार, जोधपूर ते नालिया पर्यंतची परतीची सीमा रविवारी (ता.२) कायम आहे.
पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे आणि ईशान्य बंगालच्या उपसागरात नव्याने चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे.
Weather Update :आज (ता. २) कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता असून, कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, आणि कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.
विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) Weather Update :
कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर.
हे हि वाचा : मोहरी पेंड ठरेल तेलापेक्षाही अधिक मौल्यवान