पूर्वहंगामी ऊस लागवड तंत्रज्ञान - डिजिटल शेतकरी

पूर्वहंगामी ऊस लागवड तंत्रज्ञान

महाराष्ट्रात  गेल्या पन्नास  वर्षात साखर कारखानदारी बरोबरच उसाचे क्षेत्र, साखर उत्पादन यामध्ये भरीव वाढ झालेली दिसून येत आहे. मात्र प्रती हेक्टरी ऊस उत्पादकतेमध्ये फारशी वाढ झाल्याचे दिसून येत नसते. आजही राज्याची सरासरी उत्पादकता एकरी ३५-४०  टन एवढीच आहे. या परिस्थितीत उसाखालील क्षेत्र वाढविण्यापेक्षा उसाची प्रती हेक्टरी उत्पादकता वाढविणे अत्यंत म्हत्वाचे गरजेचे आहे. महाराष्ट्रात उसाची लागवड सुरु, पुर्वहंगामी आणि आडसाली या तीन हि  हंगामात केली जात असते. या तीनही हंगामाची तुलना करता पूर्वहंगाम फायदेशीर असल्याचे दिसून येत आहे.

उगवणीपासूनच पूर्वहंगाम उसास अनुकूल हवामान मिळत असते. त्यामुळे उगवण चांगली होऊन फुटवा दमदार येत असतो. खरीप हंगामामध्ये इतर पीक घेऊन किंवा पूरबुडीत क्षेत्रामध्ये पूर् ओसरल्यानंतर पूर्वहंगामी लागण करता येत असते. तसेच उन्हाळ्यामध्ये पाण्याचा ताण बसणा-या ठिकाणी पूर्वहंगामी ऊस ६ ते ८  महिन्यांचा झालेला असल्यामुळे हे पीक पाण्याचा ताण चांगल्या प्रकारे सहन करू शकत असते. तसेच कोड व रोग यांचा प्रादुर्भाव सुरु व खोडवा उसाच्या तुलनेत कमी राहत असतो. त्यामुळे पूर्वहंगामी उसाची उत्पादकता वाढविण्यासाठी जमिनीची निवड व पूर्वमशागतीपासून उसाच्या तोडणीपर्यंत पुढीलप्रमाणे योग्य ती काळजी व नियोजन करणे फार आवश्यक आहे.

जमीन व पूर्वमशागत

उसासाठी मध्यम ते काळी  भारी मगदुराची व उत्तम निचन्याची जमीन असावी. अशा जमिनीची खोली ७०  ते १२0 सें.मी. असावी तसेच सेंद्रिय कर्बाचे प्रमाण O.५ टक्के एवढे  पेक्षा जास्त असावे.

जमिनीची उन्हाळ्यात उभी व आडवी खोल नांगरट करून घावी. जमीन तापल्यानंतर ढेकळे फोडावीण्यात यावी. कुळवाच्या उभ्या-आडव्या पाळ्या घालून जमीन भुसभुशीत करावी व जमीन सपाट केल्यानंतर रिजरच्या साहाय्याने भारी जमिनीत १३० ते १५0 सें.मी. व मध्यम जमिनीत १10  ते १२० सें.मी. अंतरावर स-या पाडाव्यात. पट्टा पद्धतीने लागवड करावयाची असल्यास मध्यम जमिनीसाठी २.५ ते ५.० फूट व भारी जमिनीसाठी ४   ते ६ फूट अशा जोडओळ पद्धतीचा अवलंब करण्यात यावा. पट्टा पद्धतीचा आंतरपीक घेण्यासाठी व ठिबक सिंचन संच बसविण्यासाठी चांगला उपयोग होत आहे. यांत्रिक पद्धतीचा (पॉवर टिलर/लहान ट्रॅक्टर) वापर करावयाचा असल्यास दोन सरीतील अंतर १३० ते १५० से.मी. (चार ते पाच फुटापर्यंत) ठेवावे.

उसाच्या सुधारित जाती

पूर्वहंगामी उसाची लागवड करण्यासाठी वाण फुले २६५, को. वाण  ८६0३२ (निरा) या मध्यम पक्वतेच्या आणि को. वाण  ९४o१२ (सावित्री), को. वाण सी. ६७१, व्हीएसआय- ४३४ आणि याचवर्षी पूर्वप्रसारित करण्यात आलेला उसाचा नवीन वाण एमएस- १ooo१ या लवकर पक्व होणा-या सुधारित जातींची निवड करण्यात यावी. वरील वाणाबरोबरच कोल्हापूर विभागासाठी वाण  को. ९२oo५ या वाणाचीही शिफारस करण्यात आलेली आहे.

उसाची लागवड

पूर्वहंगामी उसाची लागवड १५ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या कालावधीतच करावी. ऊस लागवडीसाठी बेणे मळ्यातील बेणेच चागले वापरावे. दर ३ ते ४ वर्षांनी ऊस बेणे बदलणे गरजेचे आहे. उसाची लागवड एक डोळा किंवा दोन डोळ्यांची टिपरी वापरून करण्यात यावी.

लागवड एक डोळा पद्धतीने करावयाची असल्यास दोन डोळ्यातील अंतर ३0 सें.मी. ठेवावण्यात यावे. शक्यतो कोरड्या पद्धतीने लागण करण्याचा प्रयत्न करावा. डोळा वरच्या बाजूस ठेवून हलकेसे पाणी वर  द्यावे. दोन डोळ्यांची टिपरी वापरावयाची असल्यास दोन टिपरीमधील अंतर १५ ते २० सेंमी ठेवणे गरजेचे आहे. यासाठी ओल्या पद्धतीने लागण केली तरी चालेल, मात्र टिपरी खोल दाबली जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी हे म्हत्वाचे. लागणीसाठी हेक्टरी दोन डोळ्यांची २५,000-२५५००  टिपरी लागतील . एक डोळा पद्धतीने तयार केलेल्या रोपांची लागवड करावयाची असल्यास दोन रोपातील अंतर हे  १.५ ते २ फूट ठेवावे व सरीतील अंतर ४ फूट ठेवने गरजेचे आहे. या पद्धतीने हेक्टरी १३,५०० ते १४,५०० रोपे लागतील.

बेणे प्रक्रिया

लागणीसाठी बेणे मळ्यात वाढविलेले ९ ते ११ महिने वयाचे निरोगी, रसरशीत आणि अनुवंशिकदृष्ट्या शुद्ध बेणे वापरल्यास ऊस उत्पादनात १५ ते २0 टक्के वाढ़ होत असते.

काणी रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी तसेच कांडीवरील खवलेकोड व पिठ्याढेकूण यांच्या नियंत्रणासाठी १०० ग्रॅम कार्बन्डॅझिम व ३५०  मि.ली. मॅलॅथिऑन किंवा डायमिथोएट १00 लीटर पाण्यात मिसळून बेणे १०-१५  मिनिटे बुडवावे. या प्रक्रियेनंतर ऑसिटोबॅक्टर १० किलो व स्फुरद विरघळविणारे जिवाणूखत १.२५ किलो १00-१२०  लीटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात टिपरी ३०-३५  मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी. जिवाणूखताच्या प्रक्रियेमुळे ५०-५५  टक्के नत्र व २५-३०  टक्के स्फुरद खतांची बचत होते व उत्पादनात वाढ होते.

एकात्मिक खत व्यवस्थापन

पूर्वहंगामी उसासाठी ६०  ते ७०  गाड्या चांगले कुजलेले शेणखत अगर कंपोस्टखत टाकून जमिनीत मिसळावे. यापैकी अर्धी  मात्रा दुस-या नांगरटीपूर्वी द्यावी व उर्वरित मात्रा सरीमध्ये देण्यात यावी. शेणखत अगर कंपोस्टखत उपलब्ध नसल्यास ऊस लागवडीपूर्वी ताग किंवा धैचा यासारखे हिरवळीचे पीक घेऊन जमिनीत मिसळून  गाडावे. उसासाठी रासायनिक खतांचे व्यवस्थापन योग्य करण्यात यावी. स्फुरद व पालाशयुक्त खते लागणीपूर्वी सरीत पेरून दिली पाहिजे. नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी नत्रयुक्त खते उसाच्या मुळाच्या सानिध्यात येतील अशा पद्धतीने देण्यात यावी. तसेच युरियाचा वापर करताना निंबोळी पेंडीचा ६: १ या प्रमाणात वापर करण्यात यावा.

जमिनीचे माती परीक्षण करून घेतल्यानंतर सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असणा-या जमिनीसाठी गरजेनुसार हेक्टरी २५-२७  किलो फेरस सल्फेट, २०-२२  किलो झिंक सल्फेट, १०-११  किलो मॅगनिज सल्फेट व ५ किलो बोरॅक्स चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये (१o: १ प्रमाणात) ५ ते ६ दिवस मुरवून सरीत द्यावे.

मोठी बांधणी

ऊस पीक ४.५  ते ५  महिन्याचे झाल्यानंतर पहारीच्या अवजाराने वरंबे फोडून व नंतर सायन कुळव चालवून आंतरमशागत करावी व रासायनिक खतांची मात्रा देऊन रिजरच्या साहाय्याने मोठी बांधणी करावी व पाणी देण्यासाठी स-या-वरंबे सावरुन घ्यावेत.

पाणी व्यवस्थापन

ऊस लागवडीपासून मोठ्या बांधणीपर्यंत सर्वसाधारणपणे पाण्याच्या पाळ्या ८ -८ सें.मी. खोलीच्या द्याव्यात. त्यानंतर १o-11  सें.मी. खोलीच्या पाणी पाळ्या द्याव्यात. हंगामानुसार उन्हाळ्यात ८ ते ११  दिवसांनी, पावसाळ्यात गरजेनुसार १४ ते १६  दिवसांनी व हिवाळ्यात १८ ते २१  दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. यापेक्षा अधिक पाण्याचा वापर करु नका. पाण्याच्या जास्त वापरामुळे जमीन क्षारयुक्त बनते व अतिरिक्त पाण्याचा निचरा होऊन पाण्याबरोबर अन्नद्रव्यांचाही -हास होत असतो. त्यामुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता कमी होते. ठिबक संचाचा वापर करावयाचा ठिबक सिंचनामुळे ५० टक्के पाण्याची बचत होत असते. तसेच ठिबक संचाद्वारे खते दिल्यास खतांमध्ये २0 टक्क्यांपर्यंत बचत होऊन ऊस उत्पादनात १५ ते २५  टक्के वाढ होते.

 

3 thoughts on “पूर्वहंगामी ऊस लागवड तंत्रज्ञान”

Leave a Comment