पहारीच्या साह्याने खते देण्याच्या पद्धतीचे फायदे
उसाच्या वाढीसाठी रासायनिक खतांचा कार्यक्षमपणे वापर होण्यासाठी राहुरी येथे प्रयोग घेण्यात आले होत्ते. त्यामध्ये पहारीसारख्या अवजाराच्या साह्याने खते दिल्यास इतर पद्धतींपेक्षा अधिक ऊस उत्पादन व आर्थिक फायदा झाल्याचे आढळून आले आहे. या पद्धतीत खतमात्रा दोन समान हप्त्यांत द्यावी लागत असते. पहिली खतमात्रा खोडवा ऊस तुटल्यानंतर वाफसा आल्यावर ५०-६० टक्के रासायनिक खताची शिफारशीत मात्रा (सूक्ष्म अन्नद्रव्यांच्यासह) पहारीच्या साह्याने बेटापासून 15-१७ सें. मी. अंतरावर आणि 10 ते १४ सें. मी. खोल छिद्र घेऊन उसाच्या एका बाजूस द्यावी. दोन छिद्रांमधील अंतर 30 सें. मी. ठेवणे गरजेचे आहे. दुसरी मात्रा विरुद्ध बाजूस त्याच पद्धतीने 135-१४० दिवसांनी द्यावी.
हे हि वाचा :पूर्वहंगामी ऊस लागवड तंत्रज्ञान
पहारीच्या साह्याने खते देण्याच्या पद्धतीचे फायदे
खत मुळांच्या सान्निध्यात दिले जाते, त्यामुळे ते पिकास त्वरित लागू होते. दिलेल्या रासायनिक खतांचा वातावरणाशी प्रत्यक्ष संबंध कमी येत असल्याने हवेद्वारा फार कमी प्रमाणात खतांचा ऱ्हास होत असतो. खत जमिनीत गाडल्यामुळे वाहून जात नाही ते मुळशी पोहच होत. तणांचा प्रादुर्भाव फारच कमी दिसून येतो आणि खुरपणीवरील खर्चात ६० ते ७५ टक्के बचत होते. रासायनिक खतांची पिकांच्या गरजेनुसार हळूहळू उपलब्धता होऊन पिकाची जोमदार वाढ होते आणि भरघोस उत्पादन मिळत असते. सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात खत वापरणे शक्य होते, त्यामुळे सर्वत्र एकसारख्या प्रकारचे पीक येते आणि ऊस उत्पादनात ११ ते १५ टक्के वाढ होत असते. या पद्धतीत आपण एका वेळी एकाच बाजूने खते वापरत असल्याने, तसेच खते खोडापासून दूर असल्याने विरुद्ध बाजूस उपयुक्त जिवाणू नेहमीप्रमाणे वाढत राहत असते. रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढत असते. पीकवाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेत नत्र, स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांचा पुरवठा झाल्यामुळे ऊस उत्पादनात वाढ होत असते.