Sanjay Raut ED action: पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेण्यात आले आहे. आज सकाळी 7 वाजेपासून राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी त्यांची चौकशी सुरू होत होती. ईडीच्या 8 ते 10 अधिकाऱ्यांकडून राऊतांची सूमारे 9 तास चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
संजय राऊत यांची चौकशी सुरू असताना त्यांच्या घराबाहेर शिवसेनेचे कार्यकर्तेदेखील जमू लागले होते . त्यामुळे सुरक्षेसाठी पोलिसांसह सीआरपीएफचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता आणि साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने त्यांना ताब्यात घेतले आहे. आता ईडी कार्यालयात राऊत यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी ईडीच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे यावेळी त्यांनी परत एकदा ‘झुकेंगे नहीं’चा नारा दिला आहे.
काय म्हणाले राऊत?
ईडीच्या कार्यालयाबाहेर माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, ‘माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू होत आहे पण, मी महाराष्ट्राशी कधीच बेईमानी करणार नाही. ते मला अटक करत आहेत, मी अटक व्हायला तयार आहे आणि शिवसेनेला त्रास देण्यासाठी आणि महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी हे सगळं षडयंत्र सुरू आहे.’
‘महाराष्ट्र कमजोर होतोय’
‘मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे आणि आम्ही लढणार, शिवसेना अन् महाराष्ट्र इतका कमजोर नाही. माझ्याविरोधात खोटी कारवाई, खोटे खटले टाकले जात आहे. काहीही झाले तरी मी पक्ष सोडणार नाही.’ राऊतांवरील कारवाईवर आमदार संजय शिरसाट यांनी आनंद व्यक्त केला जात आहे. त्यावर बोलताना राऊत म्हाले की, ‘पेढे वाटा, महाराष्ट्र कमजोर होतोय, तुम्ही पेढे वाटत बसा आणि बेशरम लोक आहात तुम्ही,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे.
1 thought on “संजय राउत ईडी च्या ताब्यात”