chilli crop: शेतकरी मित्रांनो आपण मिरची या पिकाचे नियोजन कसे करायचे त्यामध्ये मिरचीसाठी आवश्यक अनुकूल असणारे हवामान कोणते,जमीन कोणती असावी, कोणत्या हंगामात मिरचीची लागवड करणे अति उत्तम असणार आहे भाव कसा मिळेल तसेच मिरचीच्या जाती या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या. किती एकरामध्ये किती बियाण्याची लागवड ही करायला पाहिजे म्हणजे उत्पादन हे अधिक दर्जेदार येईलते पाहू . तसेच जमिनीची पूर्वमशागत, मिरचीची लागवड कशी करायची, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, मिरचीची अंतरमशागत, प्रति हेक्टरी उत्पादन किती मिळते, या सर्व गोष्टींची माहिती आपण सविस्तर पहाणार आहोत.
जर तुम्ही या पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात मिरचीचे लागवड करण्याचे नियोजन करत असाल, तर त्यासाठी सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय अनुकूल व परिपूर्ण माहिती शेतकऱ्यांसाठी देत आम्ही आहोत.मिरची या पिकाची मागणी ही वर्षभर चालूच असते. याकरीता भारतीय मिरचीला परदेशातूनही चांगली मागणी असते . भारतात मिरची लागवड ही अंदाजे एक ते दीड लाख हेक्टर शेती क्षेत्रावर केली जाते. तसेच मिरचीमध्ये जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने मिरचीला संतुलित आहार मध्ये समावेश जास्त केला जातो. चविष्ट ,तिखटपणा आणि स्वाद यामुळे मिरची महत्त्वाचे मसाल्याचे पीक असे समजले जाते.
मिरचीसाठी अनुकूल हवामान कोणते ?
मिरचीसाठी उष्ण किंवा दमट हवामानात अनुकूल पोषक असते. अश्या हवामानात मिरचीचे पीक अधिक चांगल्या प्रकारे येते. मिरचीची लागवड ही उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये करतात . पावसाळ्यात जास्त पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्याने फुलांची गळ जास्त प्रमाणात होत असते . त्यामुळे पाने व फळे कुजण्याची शक्यता असते. मिरचीची वाढ २६ ते ३० अंश सेल्सिअस तापमानाला चांगली होते आणि उत्पादन ही भरपूर प्रमाणात निघते. मिरची पिकाच्या बियाण्यांची उगवण ही २० ते २७ डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये उत्तम प्रकारे होते
मिरचीसाठी जमीन कोणती निवडावी?
पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम जमीन मिरची पिकाच्या लागवडीस ही अतिउत्तम असणार आहे ती निवडावी . तसेच हलक्या जमिनीत योग्य प्रमाणात निमबळी ,सेंद्रिय खते वापरल्यास अती जमीन मिरचीच्या पिकास योग्य ठरू शकते. पाण्याचा योग्य प्रमाणात निचरा होत नसेल, तर त्या जमिनीत मिरचीचे पीक अजिबात घेऊच नये. मिरचीसाठी मध्यम काळी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन ही शेतकऱ्याने निवडावी कारण त्या जमिनीत पीक उत्पादन अधिक चांगले होऊ शकते. जर तुम्ही उन्हाळ्यात या पिकाची लागवड करण्याचे विचार करत आहात, योग्य तर मध्यम ते भारी जमिनीत मिरचीची लागवड करावी. तसेच जर तुमच्याकडे चुनखडी असलेली जमीन असेल, तर त्यामध्ये ही मिरचीचे पीक खूप चांगल प्रकारे येते.
मिरची पिकाची लागवड कधी करायची ?
chilli crop खरीप मिरची पिकाची लागवड जून,जूलै महिन्यात यादरम्य करावी. उन्हाळी पिकाची लागवड जानेवारी, फेब्रूवारी महिन्यातयादरम्यान करावी.
मिरचीच्या जाती आणि त्यानुसार याची वैशिष्ट्ये कोणती पुसा सदाबहार पिकलेली मिरची तेजस्वी लालसर रंगाची असते.
या जातीची पाने इतर जातींपेक्षा रुंद असतात आणि झाड उंच असते.
या जातीच्या हिरव्या मिरचीच्या सरासरी उत्पन्न हे आट ते दहा टन व वाळलेल्या मिरचीचे उत्पन्न दीड ते दोन टन शेतकऱ्याला मिळू शकते.
ही जात मावा, कोळी या किडींना तसेच डायबॅक आणि विषाणूजन्य रोगांना प्रतिकारक समता आहे.
संकेश्वरी -३२ या जातीची झाडे ही थोडी उंच असतात.
वाळलेल्या मिरचीचा रंग हा गडद लाल, लाल्कालापात असतो.
या जातीच्या मिरचीच्या साल पातळ असते आणि ती २२ ते २५ सेंटीमीटर पर्यंत लांब असते व त्यावर सुरकुत्या असतात.
पुसा ज्वाला या जातीची मिरची वजनदार आणि खूप तिखट असतात,पिकलेली लाल मिरची ही खूप बरीच तिखट असते आणि ती मसाल्यासाठी वापरली जाते.
मुसळवाडीया जातीची झाडे उंच असतात खरीप हंगामासाठी ही जात खूप चांगली आहे.
या जातीच्या मिरची बोकड्या आणि डायबॅक या रोगांना कमी प्रमाणात बळी पडतात.
पंत सी-१ पंतसीवन या जातीच्या मिरच्यांचे उत्पादन हे दोन्ही साठी चांगले होत आहे . म्हणजेच हिरव्या व वाळलेल्या मिरच्या यांसाठी या जातीचे उत्पादन हे खूप चांगल्या प्रतीचे मिळते. या जातीची फळे उलटी असतात.फळे नऊ ते दहा सेंटिमीटर लांब असून याची साल जाड असते.या मिरचीतील बियांचे प्रमाण हे जास्त अधिक प्रमाणात असते.या जातीच्या मिरच्या ह्या बोकड्या रोगास प्रतिकारक समता आहेत. या प्रकारच्या मिरच्या पिकल्यानंतर खूप आकर्षक म्हणजेच खूप लाल रंगाच्या दिसते.
लागवडीसाठी प्रति एकरी किती बियाण्यांचे प्रमाण किती वापरावे ?
मिरची लागवड करताना दर हेक्टरी एक ते दीड किलो बियाणे वापरावे कमी जास्त प्रमान .
मिरची लागवडीसाठी पूर्व मशागत कशी करावी?
मिरची लागवडीच्या आधी एप्रिल-मे महिन्यात जमीन पुरेशी नांगरून तयार करावी आणि त्या जमिनीत हेक्टरी ९ ते १२ टन कुजलेले शेणखत मिसळावे.
जमिनीची पूर्वमशागत झाल्यानंतर लागवड कशी करायची?
जिरायती पिकासाठी वाफ्यावर रोपे तयार करतात, तर बागायती पिकासाठी गादीवाफ्यावर रोपे तयार केली तर जास्त फायदेशीर असते.गादीवाफे तयार करण्यासाठी जमीन नांगरून ,रोटा आणि कुळवून भुसभुशीत केली जाते.
जमिनीत दर हेक्टरी १६ -२० टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. त्यानंतर २६ फूट लांब चार फूट रुंद दहा सेंटिमीटर आकाराचे गादी वाफे तयार करावेत.प्रत्येक गादी वाफ्यावर ३० किलो चांगले कुजलेले शेणखत आणि अर्धा किलो सुफला मिसळावे.बी पेरणीसाठी आठ ते दहा सेंटिमीटर अंतरावर रुंदीला समांतर ओळी तयार करून घ्याव्यात.त्यामध्ये दहा टक्के फोरेट दाणेदार १५ ग्रॅम टाकून मातीने झाकून घ्यावे.
त्यानंतर या ओळी मध्ये दोन ते अडीच सेंटीमीटर ओळीवर पातळ पेरणी करावी व बी मातीने झाकून टाकावे.बियाणांची उगवण होईपर्यंत दररोज पाणी द्यावे .त्यानंतर ३५ ते ४० दिवसांनी रोपे लागवडीस तयार होतील.उंच व पसरट मिरचीचं जातींची लागवड ही १६१६ सेंटीमीटर एवढ्या अंतरावर करावी आणि जी मिरचीच्या बुटक्या जातींची रोपांची लागवड ६०४५ अशा अंतरावर करावी.chilli crop
मिरचीची लागवड ही ४५*४५ अंतरावर केली तर उतमच , रोपांची सरी-वरंबा पद्धतीने लागवड करा . रोपे गादीवाफयातून काढल्यानंतर लागवडीपूर्वी रोपांचे शेंडे दहा लिटर पाण्यात 20 मिली मोनोक्रोफॉस ३६-४० टक्के प्रवाही , २५ ग्रॅम डायथेन एम-४५ आणि ३० ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक ८०% मिसळलेल्या द्रावणात बुडवून लावावीत.
मिरची पिकाचे खत आणि पाणी व्यवस्थापन कसे करायचे ?
मिरची पिकाचे खत व्यवस्थापन याबाबतही जाणुन घ्या मिरची पिकाच्या कोरडवाहू पिकासाठी दर हेक्टरी ५५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद हे जमिनीत घालावे.
ओलिताच्या मिरची पिकासाठी दर हेक्टरी ५५ किलो पालाश, ५५ किलो नत्र आणि ५५ किलो स्फुरद हे जमिनीला द्यावे.यापैकी स्फुरद आणि पालाश यांची पूर्ण मात्रा आणि नत्राची अर्धी मात्रा रोपांच्या लागवडीच्यावेळी जमिनीत मिसळावी द्यावी. उर्वरित नत्राची अर्धी मात्रा शिल्लक राहते ती मात्रा रोपांच्या लागवडीनंतर ३० दिवसांनी मिरची पिकास पिकाला बांगडी पद्धतीने देण्यात यावी द्यावी.मिरचीला वेळेवर कोळपणी व खते दिल्याने रोपांची वाढ अधिक चांगल्या प्रकारे होत असते.
मिरची पिकाचे पाणी व्यवस्थापन –
जर बागायती मिरची असेल, वापस तर लागवडीच्या जमिनीप्रमाणे मिरची पिकाला पाणी द्यावे.
मिरची पिकाला प्रमाणापेक्षा जास्त ही पाणी देऊ नये आणि कमी पाणी देऊ नये,मिरचीची झाडे फुलावर आणि फळावर आले असताना, झाडांना पाण्याचा ताण द्यावा.chilli crop
रोपे लावणीनंतर ९-१० दिवसात शेतात रोपांचा जम बसतो. या काळात एक दिवसाआड हे रोपांना पाणी द्यावे.त्यानंतर एक आठवड्यात किंवा पाच/सहा दिवसांच्या अंतरानं मिरची पिकाला पाणी द्यावे.जर तुम्ही मिरची मिरची लागवड हिवाळ्यात करत असाल, तर हिवाळ्यात १०-१५ दिवसांच्या अंतराने मिरची पिकाला पाणी दिले पाहिजे .जर तुम्ही लागवड उन्हाळ्यात करत असाल, तर ६ ते ७ दिवसांच्या अंतराने झाडांना पाणी द्यावे.chilli crop
प्रति हेक्टर मिरचीचे उत्पादन किती निघते ?
बागायती हिरव्या मिरच्यांचे उत्पादन हेक्टरी ९० -१०० क्विंटल मिळते. तर कोरडवाहू मिरचीचे उत्पादन ६ ते ७ किवा जास्त क्विंटल येते.वाळलेल्या लाल मिरच्यांचे उत्पादन ८ -१० क्विंटल निघते.
मिरचीच्या पिकाची अंतर मशागत कशी करावी?
२२ -२५ दिवसांनंतर पहिली खुरपणी करावी. शेत तण, गवत विरहित ठेवण्याचा प्रयत्न करावा. लागवडीनंतर दोन ते तीन आठवड्यांनी खरीप मिरचीला मिरचीचा रोपांना माती भर द्यावी.
मिरची पिकाची तोडणी कधी करायची?
लागवडीनंतर साधारण अडीच ते तीन महिन्यांनी मिरचीची पहिली तोडणी सुरू करावी.झाडांची पूर्ण वाढ झाल्यानंतर नऊ ते दहा दिवसांच्या अंतराने मिरचीची तोडणी करावी.
साधारणपणे तोडणी सुरु झाल्यानंतर आडीच तीन महिने तोडे सुरू राहतात. अशा प्रकारे या तीन महिन्यांमध्ये ८ ते १० मिरचीचे तोडे हे सहज होतात.वाळलेल्या मिरची साठी त्या पूर्ण झाडावर पिकून गेल्यानंतर त्यांची तोडणी सुरु करण्यात यावी.
हे हि वाचा : सेंद्रिय शेती अशी करा सेंद्रिय शेती संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
2 thoughts on “chilli crop: हंगामी मिरची पीक लागवड शेतकऱ्यांसाठी सोपी पद्धत 2022”