अत्याधूनिक तुषार सिंचन हिरा रेनगन - डिजिटल शेतकरी

अत्याधूनिक तुषार सिंचन हिरा रेनगन

तुषार सिंचन अवर्षणग्रस्त परिस्थिती,शेतकऱ्यांची आर्थिक हलाखी,अश्या वेळीस मदतीस धावून आली ती सूक्ष्म सिंचन प्रणाली ह्याच प्रणालीतील एक घटक म्हणजे तुषार सिंचन होय. पिकांना फवाऱ्यासारखे पाणी या पद्धतीद्वारे तुषार सिंचन देता येते. ह्या प्रणालीतील अतिआधुनिक प्रकार म्हणजे पिकांना पावसासारखे फवारून पाणी देण्यासाठी विकसित केलेली तुषार सिंचन पद्धती- रेनगन होय. रेनगनचे पाणी पावसासारखे पडत असल्याने पिकांच्या पानावरील धूळ स्वच्छ होऊन प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढत असतो. त्यामुळे अन्नद्रव्ये तयार करण्यास मदत होऊन झाडांची वाढ चांगली होते व उत्पादन प्रमाण  वाढते.

  • रेनगन पद्धतीची वैशिष्ठ्ये :-

१) पिकांवर फवारले जाणारे पाणी अगदी श्रावणसरीसारखे रीमझिम पडते बुरबुर पाउस सारखी.

२) जमिनीचा प्रकार, निचरा क्षेत्र यानुसार कमी जास्त प्रवाहाचे नोझल्स बसविता येत असतात.

३) रेनगन डोंगराळ, चढ-उताराच्या जमिनी, ओलितासाठी सहज वापरता येत असते.

४) पानावर पाण्याची फवारणी होत असल्यामुळे बुरशीजन्य रोगांपासून व किडींपासून संरक्षण हे जास्त  मिळते.

५) अति उन्हात व कोरड्या हवामानात फवारा पद्धतीमुळे बागेतील तापमान कमी राहून आद्रता वाढते व त्यामुळे झाडांची वाढ चांगल्या प्रमाणात होत असते.

६) वालुकामय जमिनीमध्ये पाण्याची आडवी ओल निर्माण करणे अवघड जात  असते. अश्या वालुकामय जमिनीत ओलावा निर्माण करण्यासाठी रेनगन फायदेशीर ठरत आहे.

७) पाण्याचा फवारा पावसाच्या पाण्याप्रमाणे होत असल्यामुळे हवेतील अन्नघटक पाण्यात मिसळून द्रवरुपात पिकाला सहज मिळतात.

८) विद्राव्य खतांचा वापर केल्यास फोलीअर स्प्रे प्रमाणे अन्न्न्घटक पिकास मिळत असतात तुषार सिंचन.

९) ऊस, भाजीपाला, केळी, द्राक्ष, कांदा,बटाटा, भुईमुग,चहा,कॉफी,कापूस,तृणधान्य, गळीतधान्य या पिकांना अत्यंत उपयोगी तुषार सिंचन आहे.

  • रेनगन वापरतांना घ्यावयाची काळजी :-

१) रेनगन आणि ट्रायपॉड स्टॅण्ड एका जागेवरून दुसरीकडे नेत असतांना गन एखाद्या टणक जागेवर पडणार नाही याची काळजी  याची काळजी घ्यावी.

२) रेनगनला तेल किंवा ऑईल हे लावूच  नये. त्यामुळे गनच्या कार्यामध्ये अडथळा होऊन बध पडू  शकतो.

३) रेनगनचे नोझल कुठल्याही खडबडीत किवा इतर  वस्तूने साफ करू नये.

४) ओलित संपल्यानंतर रेनगन काढून स्वच्छ करून सुरक्षित ठिकाणी जपून  ठेवावी.

५) रेनगन सुरु करण्यापूर्वी पाईपलाईन फ्लश पाणिनी साफ  करून घ्यावी.

६) ट्रायपॉड स्टॅण्डची उभारणी अचूक झाली आहे ह्याची काळजी घेणे म्हत्वाचे आहे.

Leave a Comment