मुंबई : शेतकर्यासाठी आनंदाची बातमी मागील वर्षी लांबलेला ऊस गाळप हंगाम (Sugarcane Crushing Season) लक्षात घेता यंदा १ ऑक्टोबरपासून हंगाम सुरू करण्यासाठी सोमवारी (ता. १८) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिसमितीची बैठक आयोजित करण्यात येत आहे. सह्याद्री अतिथिगृहावर दुपारी एक वाजता ही बैठक सुरु होईल. गाळप हंगामाची(Sugarcane)वाट बिकट असल्याने यातून नेमका काय मार्ग काढणार? याकडे कारखानदारांचे लक्ष लागून आहे.
राज्यात मागील वर्षी प्रदीर्घ काळानंतर सर्वाधिक काळ हंगाम लांबला होता. त्यामुळे सरकारला वाहतुकीवर आणि प्रतिटन उसावर अनुदान द्यावे लागले आहे. हा अनुभव पाठीशी असल्याने प्रशासनाने यंदा लवकर हंगाम (Sugarcane)सुरू करण्यासाठी हालचाली सुरू देखील केल्या आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही पावसाळी अधिवेशनात हंगाम लवकर सुरू केला, तरच वेळेत ऊस(Sugarcane) गाळप होईल तसेच मागील वर्षी १२ लाख ३२ हजार हेक्टरवर उसाची लागवड होती. तर यंदा ती वाढून १४ लाख ८७ हजारांवर गेली आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गाळप हंगाम लवकर सुरू करणे फार गरजेचे आहे, असे स्पष्ट केले होते.
सप्टेंबर महिना निम्मा झाला तरी पावसाने उसंत दिलेली नाही आणि त्यामुळे प्रशासनाने कितीही तयारी केली तरी ऊस (Sugarcane)वाहतुकीस रस्ते नसल्याने साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चालतील की नाही, या बाबत शंका निर्माण होत आहे. राज्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि ऊस तोडणीसाठी बैलगाडी मालक आंतरजिल्ह्यात स्थलांतर होत असल्याने त्याबाबत काय उपाययोजना राबविणार, या बाबत स्पष्टता अजून नाही.
हे हि वाचा : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचं गिफ्ट! आज जन्मणाऱ्या बालकांना दिली जाणार सोन्याची अंगठी
जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.