PM: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचं गिफ्ट! आज जन्मणाऱ्या बालकांना दिली जाणार सोन्याची अंगठी... 2022 - डिजिटल शेतकरी

PM: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचं गिफ्ट! आज जन्मणाऱ्या बालकांना दिली जाणार सोन्याची अंगठी… 2022

पंतप्रधान(PM) नरेंद्र मोदींचा आज ७२ वा वाढदिवस आहे आणि या निमित्तानं भाजपाकडून देशभरात विविध चांगल्या  कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. भाजपाकडून (PM) मोदींच्या वाढदिवसापासून ते २ ऑक्टोबरपर्यंत देशभरात सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे असे सांगितले जात आहे. तर तामिळनाडू भाजपाकडून(PM) आगळीवेगळी घोषणा केली जात आहे. बापरे, तामिळनाडूत आज जन्मणाऱ्या बालकांना थेट सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे.

भाजपाच्या तामिळनाडू युनिटनं राज्यात आज जन्म घेणाऱ्या बालकांना सोन्यीच अंगठी देण्याची घोषणा केली जात  आहे. (PM) तसंच यासोबतच मासे वाटण्याचेही जाहीर करण्यात आले आहे आणि राज्यात जवळपास ७२० किलो मासे वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्या आला आहे. केंद्रीय मत्स्यव्यवसाय आणि माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी या घोषणेबद्दल माहिती देताना चेन्नईतील सरकारी RSRM रुग्णालयाची या उपक्रमासाठी निवड केली असल्याचं सांगितलं जात आहे. या रुग्णालयात १७ सप्टेंबर रोजी जन्मला येणाऱ्या नवजात बालकांना २ ग्रॅम सोन्याची अंगठी दिली जाणार आहे तसेच त्या प्रत्येक अंगठीची किंमत ५ हजार रुपये असणार आहे.

मुख्यमंत्री एम. के स्टालिन यांच्या विधानसभेच्या कार्यक्षेत्रात पंतप्रधान(PM) मत्स्य संपदा योजनेतर्फे मासळी फ्री वाटली जाणार असून नागरिकांना मासे खाण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वाढदिवसानिमित्त भाजपकडून विविध कार्यक्रम राबवले जाणार असल्याचे वरिष्ठ नेत्यांनी सांगितले जात  आहे. नरेंद्र या वाढदिवसाबरोबरच महात्मा गांधी यांची जयंतीनिमित्तही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.

हे हि वाचा : सोयाबीन, कापूस, तूर, ढोबळी मिरची पहा काय असतील बाजार भाव

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

Leave a Comment