देशात सध्या लाल मिरचीचे(Red chilli) दर तेजीत आहेत आणि प्रतिकूल हवामानामुळं लाल मिरचीच्या उत्पादनाला फटका बसला आहे. पाऊस आणि उष्णतेमुळं मिरची(Red chilli) पिकाची गुणवत्ताही कमी झाली आहे. त्यामुळं चांगल्या दर्जाच्या मिरचीची बाजारात सध्या टंचाई जाणवतेय, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्यातच सध्या मिरचीची(Red chilli) आवक रोडावलीय आहे. त्यामुळं बाजारात लाल मिरचीला १० हजारांपासून २२ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. तेलंगणातही मिरचीचे (Red chilli)व्यवहार सरासरी १३ हजार ते २० हजार रुपयाने होत आहेत आणि उत्पादनातील घट पाहता लाल मिरचीचे दर टिकून(Red chilli) राहण्याचा अंदाज वर्तविला आहे.
मर्यादीत आवकेमुळे भेंडीचे दर तेजीत
श्रावण आणि गणपती उत्सावामुळं भेंडीला मागणी वाढत आहे. मात्र यंदा कमी उत्पादनामुळं आवक घटलीली आहे. परिणामी भेंडीचे दर वाढले आहेत आणि केवळ राज्यातच नाही तर देशभरात सध्या भेंडीला चांगला दर मिळतोय, असं व्यापाऱ्यांनी सांगितलं जात आहे. राज्यातील पुणे, मुंबई आणि नागपूर या बाजार समित्या वगळता इतर ठिकाणी दैनंदिन भेंडी आवक ८० क्विंटलपेक्षा कमीच दिसत आहे. राज्यात भेंडीला सरासरी ३ हजार ते ५ हजार रुपये क्विंटल दर मिळत आहे. पुणे, मुंबई आणि नागपूर बाजार समितीत साधारण ३ हजार ते ६५०० रुपयांच्या दरम्यान व्यवहार होत आहेत आणि भेंडीचे दर चढे राहण्याचा जाणकारांचा अंदाज आहे.
बाजारात पपईचे दर स्थिर
देशभरात सध्या पपईला बऱ्यापैकी दर मिळत आहे. मागणी चांगली असल्यानं दर टिकून राहत आहेत. तर दुसरीकडं बाजारातील आवक कमी झाली आहे. देशातील महत्त्वाचं पपई उत्पादक राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातही सध्या आवक कमी होत आहे. येथेही पपईला प्रतिक्विंटल २ हजार ते २ हजार ५०० रुपये दर मिळताना दिसत आह. तर महाराष्ट्रात १ हजार ५०० ते ३ हजार रुपये दराने पपईचे व्यवहार सरास होत आहेत. पुढे गणेशोत्सवामुळं पपईची मागणी वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पपईचे दर टिकून राहतील, असं सध्याचं चित्र आहे.
जास्त ओलाव्यामुळे मुगाचे दर दबावात
देशातील काही बाजारांमध्ये नवीन मुगाची आवक सुरु झाली आहे. मात्र ढगाळ वातावरण आणि पावसामुळं मुगात ओलावा अधिकप्रमाणात आहे. त्यामुळं नव्या मुगाला सध्या हमीभावापेक्षा म्हणजेच ७ हजार ७५५ रुपयांपेक्षा कमी दर मिळत आहे. बाजारात जुना मूग प्रतिक्विंटल ७ हजार ७०० ते ८ हजार १०० रुपयाने विकला जात आहे. तर नव्या मुगाला ६ हजार ५०० ते ७ हजार २०० रुपये दर मिळत आहे. बाजारात पुढील काळात मुगाची आवक वाढेल आणि मात्र पाऊस उघडल्यास ओलावा कमी राहील. त्यामुळं आवक वाढल्यानंतरही मुगाचे दर पडणार नाहीत, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय जातोय .
हे हि वाचा : Cotton : नव्या कापसाला मिळतोय चांगला १२ हजाराचा दर
4 thoughts on “Red chilli : लाल मिरचीच्या दरातील तेजी टिकून”