या राज्यात मिळणार दरमहा मोफत 300 यूनिट वीज - डिजिटल शेतकरी

 या राज्यात मिळणार दरमहा मोफत 300 यूनिट वीज

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी निवडणुकीपूर्वी पंजाबच्या जनतेला दिलेला शब्द पाळला गेला आहे . आज शुक्रवार (दि.1 जुलै)पासून राज्यातील प्रत्येक घराला 300 युनिट वीज मोफत(300 Units of Free Electricity) देण्याची घोषणा भगवंत मान यांनी केली आहे. स्वतः भगवंत मान यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे आणि  त्यांच्या या निर्णयामुळे पंजाबच्या जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.

आपकडून वचनपूर्ती

मान यांनी ट्विट केले की, “आधीची सरकारे निवडणुकीच्या वेळी आश्वासने देत होती, आश्वासने पूर्ण होईपर्यंत 5 वर्षे निघून जायची आणि परंतु आमच्या सरकारने पंजाबच्या इतिहासात एक नवीन उदाहरण ठेवले आहे. आज आम्ही पंजाबच्या जनतेला दिलेले आणखी एक वचन पूर्ण करत आहोत आणि आजपासून पंजाबमधील प्रत्येक कुटुंबाला महिन्याला 300 युनिट मोफत वीज मिळणार आहे.

देशातील दुसरे राज्य

2022 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यान AAP ने दिलेल्या आश्वासनांपैकी एक म्हणजे प्रत्येक घरात प्रत्येक महिन्याला 300 युनिट मोफत वीज पुरवणे होय . आप नेते आणि राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा म्हणाले की, लोकांना मोफत वीज पुरवणारे पंजाब हे दिल्लीनंतर दुसरे राज्य बनले ठरले आहे.

Leave a Comment