तूर लागवड माहिती 2022 - डिजिटल शेतकरी

तूर लागवड माहिती 2022

खरीप हंगामामध्ये तूर हे अतिशय महत्त्वाचे पीक घेतले जात  आहे. या पिकाला २५  ते २५० से.ग्रे.तापमान चांगले मानवते. महाराष्ट्रामध्ये १२ लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर तूर हे पीक घेतले जाते.

जमीन

मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन तुरीसाठी फार चांगली असते. चोपण, पाणथळ जमिनीत तूर चांगली येत नसते.  आणि कसदार, भुसभुसीत, पोयट्याच्या जमिनीत सुद्धा तूर चांगली येते. साधारणत: ६.५ ते ७.६  सामू असलेली जमीन या पिकास योग्य असते.

पूर्वमशागत

रबी हंगामाचे पीक निघाल्यानंतर चांगली खोल नांगरट करावी आणि उन्हाळ्यात जमीन चांगली तापू देत असतात. त्यामुळे जमिनीतील किडी, अंडी व कोप इत्यादी  नष्ट होतात जमीन चांगली तापल्यामुळे सच्छिद्रता वाढते. अन्नद्रव्ये मुक्त होतात आणि जमिनीचा पोत सुधारला जातो.

पेरणीची पध्दत.

तूर हे पीक बहुतांशी म्हणून घेतले जात असते. तूर + बाजरी (१:२) तूर + सूर्यफूल (१:२), तूर +सोयाबीन (१:३ किंवा १:४) तूर + ज्वारी (१:२ किंवा १:४), तूर +कापूस, तूर + भूईमूग, तूर+मूग, तूर+उडीद (१:३) अशाप्रकारे पेरणी केल्यास दोन्ही पिकांचे उत्पादन चांगले येत असते आणि तूरीचे सलग पीक सुध्दा चांगले उत्पादन देते.

बियाणे प्रमाण

आय.सी.पी.एल – ८७ च्या पेरणीसाठी हेक्टरी २० ते २५ किलो बियाणे लागते. मध्यम मुदतीच्या विपुला व ऐ.के.टी – ८८११ या वाणासाठी हेक्टरी १२-१६ किलो बियाणे पुरते. उशिरा येणा-या आणि जास्त अंतरावर लावावयाच्या वाणासाठी हेक्टरी १० ते १२ किलो बियाणे पुरेसे असत.

बिजप्रक्रिया

पेरणीपुर्वी प्रतिकिलो बियाणास २ ग्रॅम थायरम + २-३  ग्रॅम कार्बेन्डेंझीम किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा व २५ ग्रॅम रायझोबियम गुळाच्या थंड द्रावणात मिसळून लावावे.

 

हे हि वाचा : लसूण लागवडीचे व्यवस्थापन 2022

 

आंतरपिके

तूर हे पीक सूर्यफूल, मूग,उडीद, सोयाबीन, भुईमुग, ज्वारी, बाजरी कपाशी या सरळ पिकामध्ये आंतरपिक म्हणून घेतले जाते असते आणि  आंतरपिकासाठी निवडावयाच्या तूरीच्या जाती व मध्यम मुदतीच्या असाव्यात. अलीकडच्या काळात ३ ते ५  ओळी सोयाबीन आणि एक ओळ तूर अशा पध्दतीने दोन्ही पिकांचे चांगले उत्पादन येत असल्याचे दिसून आले आहे.

खत व्यवस्थापन

सलग तुरीसाठी हेक्टरी ३०  किलो नत्र व ५० किलो स्फुरद पेरणीचे वेळी द्यावे सारखे मिश्र पिक असल्यास ज्या पिकाच्या ओळी जास्त त्या पिकाची शिफारस केलली खत मात्रा द्यावी. उदा. सोयाबीन करीता ६०  किलो नत्र आणि ७५ किलो स्फुरद अशी मात्रा द्यावी.

आंतर मशागत

पिकात १६  ते २० दिवसानंतर कोळपणी करावी. पुढे १५ दिवसांनी खुरपणी किंवा कोळपणी करावी. अधिक उत्पादनासाठी पीक पेरणीनंतर ३५ -४५ दिवस शेत तणविरहीत ठेवावे.

पाणी व्यवस्थापन

तूर हे प्रामुख्याने खरीप हंगामामधील पीक असल्यामुळे ते पावसावर वाढत असते. तथापि, पावसामध्ये खंड पडल्यास किंवा पाण्याचा ताण पडल्यास आणि सिंचनाची सुविधा असल्यास पीकास वाढीच्या अवस्थेमध्ये (३१  ते ३५ दिवस), फुलो-याच्य अवस्थेमध्ये (६५  ते ७० दिवस) आणि शेगा भरावयाच्या अवस्थेमध्ये पाणी द्याव. त्यामुळे पीक उत्पादनात वाढ होते.

पीक सरंक्षण

तुरीमध्ये फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये घाटेअळी, पिसारी पतंग, काळी माशी, या किडीमुळे ३० ते ४० टक्के नुकसान होत असत. ट्रायकोडर्मा, क्रायसोपा, एच.एन.पी.व्ही अशा जैविक किड नियंत्रणाचा वापर हा करत असतात.

काढणी

तूरीच्या शेंगा वाळल्यावर पीक कापून घ्यावे व खळ्यावर काठीच्या सहाय्याने किंवा पेढ्या झोडपून शेंगा आणि दाणे अलग करत असतात.

साठवण

साठवणीपूर्वी तूर धान्य ४-६  दिवस चांगले उन्हात वाळवून पोत्यात किंवा कोठीत साठवावे. साठवण कोदट व ओलसर जागेत करु नये. शक्य असल्यास कडूलिंबाचा पाला (५-६  टक्के) धान्यात मिसळून धान्य साठवावे. यामुळे धान्य साठवणीतील कीडीपासून सुरक्षित राहत असत.

उत्पादन

अशाप्रकारे तुरीची लागवड केल्यास सरासरी १५ ते १७  क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळू शकते.

Leave a Comment