आजचे राशिभविष्य 03-09-2022 - डिजिटल शेतकरी

आजचे राशिभविष्य 03-09-2022

🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): आजचे राशिभविष्य कौटुंबिक गोष्टीत अधिक वेळ जाईल आणि  एखाद्या क्षुल्लक गोष्टीसाठी अडून राहू नका. वयस्कर व्यक्तींचा मान राखाल आणि पैशाचा अपव्यय टाळावा. खोट्या गोष्टींना भुलू नका आणि आजच्या दिवशी आत्मविश्वासाच्या जोरावर कामे पूर्ण करता येतील. घरातील मंडळींकडे लक्ष द्या आणि घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका. नोकरीच्या ठिकाणी कामे लक्षपूर्वक करा.

वृषभ (Taurus): आजचे राशिभविष्य नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल आणि कर्तुत्वाला वाव देता येईल. वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील आणि व्यापारी वर्गाला नवीन धोरण आखता येईल. सन्मानाने भारावून जाल आणि आज पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. मित्र परिवारासह बाहेर जाण्याचा बेत करा आणि प्रिय व्यक्तींशी प्रेमाने वागा. परिवारातील मंडळींची साथ लाभेल.

मिथुन (Gemini) : आजचे राशिभविष्य तरुणांचे नवीन विचार जाणून घ्या आणि नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल. दैनंदिन कामात थोडा बदल करून पाहावा आणि सबुरीच्या मार्गाने समोरील प्रश्न हाताळा. आईचे उत्तम सहकार्य मिळेल आणि आजचा दिवस उत्तम असेल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल आणि घरातील मंडळींकडून कामाचे कौतुक केले जाईल. मित्रपरिवारासह बाहेर जाण्यास वेळ मिळेल.

कर्क (Cancer) : आजचे राशिभविष्य स्वछंदीपणे दिवस घालवाल आणि आपल्या आजच्या सर्व इच्छा पूर्ण करून घ्याल. बाहेरील परिस्थितीचा अंदाज घेऊन खरेदी कराल आणि घरातील गोष्टींसाठी वेळ द्यावा. समोरील प्रत्येक गोष्टीत रमून जाल आणि खूप दिवसांपासून अडकलेली कामे पूर्णत्वास घेऊन जाण्यास आज मदत मिळेल. कामात घाईगडबड न करता कामे आणि पूर्ण कशी होतील याकडे जास्त लक्ष द्या.

सिंह (Leo) : आजचे राशिभविष्य आततायीपणे वागून चालणार नाही आणि कामातून समाधान लाभेल. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. आणि  मुलांच्या वागण्याचा अचंबा वाटेल. हातातील कलागुण विकसित करावेत आणि प्रिय व्यक्तीशी आदराने वागा. आई-वडिलांची साथ लाभेल आणि नोकरीच्या ठिकाणी सावधगिरीने वागा. घरातील मंडळीना वेळ द्या आणि नोकरीच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा. हलगर्जीपणा करु नका

कन्या (Virgo) : आजचे राशिभविष्य घरगुती जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल आणि जवळचा प्रवास सुखकर होईल. काही खर्च अनाठायी होऊ शकतात आणि कामात भावंडे सहकार्य करतील. केलेल्या कष्टाचे समाधान मिळेल आणि आजचा दिवस संमिश्र पद्धतीचा असणार आहे. एखादी नवीन संधी चालून येण्याची शक्यता आहे आणि त्याचा पूरेपूर उपयोग करून घ्या. पैशांच्या बाबत अडचण जाणवेल आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. घरातील ताणतणावामुळे त्रस्त राहाल.

तुळ (Libra) : आजचे राशिभविष्य अतिआवश्यक असेल तरच बाहेर पडावे आणि जोडीदाराचा वरचष्मा राहील. भागीदारीत मतभेद संभवतात आणि संपर्कातील लोकांशी घनिष्ठता वाढेल. घरगुती वातावरण प्रसन्न राहील आणि आजचा दिवस सुखाचा आणि समृद्धीचा जाणार आहे. कामात यश मिळून तुमचे कौतुक केले जाईल आणि प्रिय व्यक्ती तुमच्यावर आज खुप खूश असेल. आई-वडिलांची साथ लाभेल.

वृश्‍चिक (Scorpio) : आजचे राशिभविष्य रेस, जुगार यातून लाभ संभवतो आणि मित्रांशी मनमोकळ्या गप्पा माराल. छंद जोपासायला वेळ काढाल आणि आवडत्या साहित्यात रमून जाल. कौटुंबिक सौख्याला अधिक प्राधान्य द्याल आणि आज घरातील मंडळींशी वाद होण्याची शक्यता आहे. प्रकृती बिघडेल पण योग्य वेळीच लक्ष द्या आणि आई-वडिलांशी प्रेमाने वागा. नोकरीच्या ठिकाणीसुद्धा कामे संयमाने पूर्ण करा आणि प्रिय व्यक्तीकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल.

धनु (Sagittarius) : आजचे राशिभविष्य जोडीदाराची प्राप्ती वाढेल आणि पण त्याबरोबरच एकमेकांना समजून घ्यावे लागेल. वैचारिक मतभेदाला बाजूला ठेवावे आणि काम आणि वेळ यांचा योग्य मेळ घालावा. अचानक धनलाभाची शक्यता आणि तुमच्या मित्रपरिवारामुळे तुमच्यावरील ताण कमी होईल. आई-वडिलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करु नका आणि प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका.

मकर (Capricorn) : विचारांच्या गर्दीत भरकटू नका आणि कामाची योग्य दिशा ठरवा. कल्पनेत रमून जाऊ नका आणि कृतीला अधिक महत्त्व द्यावे. बोलतांना तारतम्य बाळगा आणि आज नोकरीच्या ठिकाणी आपले काम उत्तम कसे आहे हे दाखविण्याची संधी मिळेल. आजचा तुमचा दिवस उत्साहात जाईल आणि मित्रपरिवारासह बाहेर जाता येईल. प्रिय व्यक्तीकडून तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला जाईल.

कुंभ (Aquarious) : आजचे राशिभविष्य चांगला व्यावसायिक लाभ होईल आणि आपली आजची आर्थिक गरज पूर्ण होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल आणि अपेक्षित लाभाने समाधान मिळेल. व्यावसायिक दर्जा सुधारेल आणि घरात भांडणे होण्याची शक्यता आहे. आपल्या रागावर नियंत्रण ठेवून समोरच्या व्यक्तीशी बोलावे आणि आई-वडिल यांच्या आज्ञांचे पाल करा. मित्रपरिवारासह बाहेर जाण्यासाठी वेळ काढा.

मीन (Pisces) : आजचे राशिभविष्य दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत करावा आणि आवडत्या गोष्टीत अधिक रमून जाल. कमीपणा घ्यायला घाबरू नका आणि मानापमानाच्या प्रसंगातून जावे लागू शकते. नवीन मित्र जोडले जातील आणि आज पैशांची भरभराट होईल आणि तुम्ही सर्व प्रकारचे आनंद घेण्यासाठी उत्सुक असाल. तसेच नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्ती मात्र तुमच्या वागण्यामुळे खुश नसेल आणि जवळच्या व्यक्तीशी भांडण करणे टाळा.

हे हि वाचा :  शेतकऱ्यांना या जिल्हात ७० कोटींचा विमा मंजूर

 

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

Leave a Comment